Lokmat Money > बिझनेस न्यूज > बाजार तेजीत; सेन्सेक्स १८४ अंकांनी वाढला

बाजार तेजीत; सेन्सेक्स १८४ अंकांनी वाढला

इन्फोसिसची डिसेंबर तिमाहीची कामगिरी उत्तम झाल्यामुळे शेअर बाजारांनी शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी तेजीचा दिवस पाहिला.

By admin | Updated: January 9, 2015 23:39 IST2015-01-09T23:39:50+5:302015-01-09T23:39:50+5:30

इन्फोसिसची डिसेंबर तिमाहीची कामगिरी उत्तम झाल्यामुळे शेअर बाजारांनी शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी तेजीचा दिवस पाहिला.

Market rally; The Sensex gained 184 points | बाजार तेजीत; सेन्सेक्स १८४ अंकांनी वाढला

बाजार तेजीत; सेन्सेक्स १८४ अंकांनी वाढला

मुंबई : इन्फोसिसची डिसेंबर तिमाहीची कामगिरी उत्तम झाल्यामुळे शेअर बाजारांनी शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी तेजीचा दिवस पाहिला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १८४ अंकांनी वाढला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४९.९0 अंकांनी वाढला.
इन्फोसिस ही भारताची दुसऱ्या क्रमांकाची मोठी आयटी कंपनी आहे. डिसेंबरला संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात १३ टक्क्यांची घसघशीत वाढ झाली आहे. याचा परिणाम होऊन इन्फोसिसचे समभाग ५.0२ टक्क्यांनी वाढले. याचा लाभ इतर आयटी कंपन्यांनाही मिळाला. टीसीएसचे समभाग २.८0 टक्क्यांनी वाढले. या दोन्ही कंपन्यांनी एकूण १४0 अंकांची वाढ सेन्सेक्सला दिली. त्या बळावर सेन्सेक्स १८३.६७ अंकांनी वर चढला.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी २७,४0४.१९ अंकांनी तेजीसह उघडला. नंतर तो २७,५0७.६७ अंकांपर्यंत वर चढला. त्यानंतर नफा वसुलीचे सत्र सुरू झाल्याने सेन्सेक्स २७,११९.६३ अंकांपर्यंत खाली आला. मध्यंतरानंतर तो पुन्हा उसळला आणि २७,४५८.३८ अंकांवर बंद झाला. १८३.६७ अंक अथवा 0.६७ टक्क्यांची वाढ त्याने नोंदविली.
गेल्या दोन सत्रात सेन्सेक्सने ५४९.५६ अंकांची वाढ नोंदविली आहे. ही वाढ २.0४ टक्के आहे. त्या आधीच्या तीन दिवसांत सेन्सेक्सने ९८0 अंक गमावले होते.
सीएनएक्स निफ्टी ४९.९0 अंकांनी वाढून ८,२८४.५0 अंकांवर बंद झाला.
आशियातील हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया येथील शेअर बाजार 0.१८ टक्के ते १.0५ टक्के वर चढले. चीन, तैवान आणि सिंगापूर येथील बाजार मात्र घसरले. युरोपातील जर्मनी, फ्रान्स येथील बाजार 0.११ टक्के ते 0.१३ टक्के वर चढले. ब्रिटनचा एफटीएसई मात्र 0.१0 टक्क्यांनी घसरला.
हंगामी आकडेवारीनुसार, काल विदेशी गुंतवणूकदारांनी ४६६.७८ कोटींची समभाग विक्री केली. सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३0 कंपन्यांपैकी १६ कंपन्यांचे समभाग वर चढले. १४ कंपन्यांचे समभाग घसरले.
बाजाराची एकूण व्याप्ती नकारात्मक राहिली. १,५४१ कंपन्यांचे समभाग घसरले. १,३५२ कंपन्यांचे समभाग वर चढले. ११६ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले. बाजाराची एकूण उलाढाल ३,२८४.९१ कोटी रुपये राहिली. काल मी ३,२३१.१६ कोटी रुपये झाली.
हा आठवडा मात्र सेन्सेक्ससाठी तोट्याचा राहिला. आदल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सेन्सेक्स ४२९.५२ अंकांनी खाली आला.

सेन्सेक्समधील लाभधारक कंपन्यांमध्ये एचयूएल, इन्फोसिस, डॉ. रेड्डीज लॅब, टीसीएस, ओएनजीसी, सिप्ला, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स आणि विप्रो यांचा समावेश आहे.

हिंदाल्को, सन फार्मा, टाटा स्टील आणि एचडीएफसी यांचे समभागही वाढले. घसरण सहन करावी लागलेल्या कंपन्यांत एनटीपीसी, बजाज आॅटो, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, सेसा स्टरलाईट, अ‍ॅक्सिस बँक, भारती एअरटेल, भेल, एचडीएफसी यांचा समावेश आहे.

Web Title: Market rally; The Sensex gained 184 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.