मुंबई : शेअर बाजारांतील सलग तीन सत्रांच्या घसरणीला मंगळवारी ब्रेक लागला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २१९ अंकांनी वाढून २७,३९६.३८ अंकांवर बंद झाला. आयसीआयसीआय बँक आणि मारुती सुझुकी या ब्ल्यूचिप कंपन्यांच्या समभागांनी चमकदार कामगिरी केल्यामुळे सेन्सेक्सला बळ मिळाले.
खनिज तेल आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमती उतरल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग गतिमान झाला असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे. यंदा भारताचा आर्थिक वाढीचा दर ७.५ टक्के राहील, असेही जागतिक बँकेने नमूद केले. याच दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपयाही सुधारला. याचा सुयोग्य परिणाम शेअर बाजारावर झाला. तीन दिवसांची मरगळ झटकताना सकाळी सेन्सेक्स तेजीसह २७,२१५.६१ अंकांवर उघडला. त्यानंतर तो आणखी वाढून २७,३६५.७२ अंकांवर गेला. त्यानंतर मात्र नफा वसुलीचे सत्र सुरू झाले. त्यामुळे सेन्सेक्स नकारात्मक झोनमध्ये जाऊन २७,0७३.२५ अंकांपर्यंत खाली घसरला. शेवटच्या तासात तो पुन्हा उसळला आणि २७,३९६.३८ अंकांवर बंद झाला. २१९.३९ अंकांची अथवा 0.८१ टक्क्यांची वाढ त्याने नोंदविली.
आयसीआयसीआय बँकेचा समभाग ८.२ टक्क्यांनी वाढून ३२६.६५ रुपयांवर पोहोचला. सप्टेंबर २0१३ नंतरची एका सत्रातील सर्वोच्च वाढ ठरली. मारुती सुझुकीचा समभाग ४.९३ टक्क्यांनी वाढून ३,८२६.६५ रुपये झाला. सेन्सेक्समधील इतर लाभधारक कंपन्यांत टाटा मोटर्स, भेल, भारती एअरटेल, एनटीपीसी, अॅक्सिस बँक, एसबीआय, हीरो मोटोकॉर्प, एचडीएफसी, हिंदाल्को, एमअँडएम आणि टाटा स्टील यांचा समावेश आहे.
आयटीसी, इन्फोसिस, कोल इंडिया, गेल, बजाज आॅटो, एचडीएफसी बँक, हिंद युनिलिव्हर आणि एलअँडटी या कंपन्यांचे समभाग घसरले. (वृत्तसंस्था)
४५0 कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७१.८0 अंकांनी अथवा 0.८७ टक्क्यांनी वाढून ८,२८५.६0 अंकांवर बंद झाला. त्याआधी तो ८,३0८ अंकांपर्यंत वर चढला होता.
४जागतिक पातळीवर संमिश्र कल पाहायला मिळाला. आशियाई बाजारात काही ठिकाणी वाढ, तर काही ठिकाणी वाढ दिसून आली. युरोपीय बाजार मात्र सकाळच्या सत्रात घसरणीचा कल दर्शवीत होते.
बाजारात तेजी परतली
शेअर बाजारांतील सलग तीन सत्रांच्या घसरणीला मंगळवारी ब्रेक लागला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २१९ अंकांनी वाढून २७,३९६.३८ अंकांवर बंद झाला.
By admin | Updated: April 28, 2015 23:44 IST2015-04-28T23:44:23+5:302015-04-28T23:44:23+5:30
शेअर बाजारांतील सलग तीन सत्रांच्या घसरणीला मंगळवारी ब्रेक लागला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २१९ अंकांनी वाढून २७,३९६.३८ अंकांवर बंद झाला.
