खेदीसाठी दिवसभर गर्दी : दहा लाखांची झाली उलाढालनाशिक : दसर्याच्या निमित्ताने शनिवारी सायंकाळपासून झेंडूच्या फुलांनी बाजारपेठ फुलली होती. दसर्याला सकाळपासूनच फुलांना मागणी वाढल्याने दिवसभरात सुमारे दहा लाख रुपयांची उलाढाल झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. दसर्याच्या पूर्वसंध्येला सुमारे १५० वाहनांमधून झेंडूची फुले दाखल झाली होती. दसर्याला घर-दुकानांना फुलांचे तोरण, तर वाहनांना हार केला जातो. त्यामुळे फुलांना मोठी मागणी असल्याने झेंडूची फुले प्रति शेकडा ८० ते १०० रुपयांनी विकली गेली. शेवंतीची फुलेही ८० ते १०० रुपये, तर गुलाब १५ रुपये जुडी, विली १५ ते २० रुपये जुडी, तर मोगरा ८०० रुपये किलोने विकला गेला. बाजारात चार किलोच्या जाळीला सुमारे २५० रुपयांचा भाव होता. दसर्याच्या मुहूर्तावर फुलबाजारात सुमारे दहा लाख रुपयांची उलाढाल झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. बाजारपेठेत चांदवड, निफाड, दिंडोरी आणि शहर परिसरातून मोठ्या प्रमाणावर झेंडूच्या फुलांची आवक झाली़ गुलाबाची फुले दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथून, तर शेवंतीची फुले नगर जिल्ातून विक्रीसाठी आली़ (प्रतिनिधी)सायंकाळनंतर फुलांचे ढिगारेशहरातील उपनगरीय चौकांमध्ये सकाळपासून फुलांची दुकाने थाटली होती. सायंकाळपर्यंत विक्री केल्यानंतर शिल्लक राहिलेली झेंडूची फुले तशीच सोडून विक्रेते निघून गेल्याने ठिकठिकाणी फुलांचे ढिगारे पडून होते. सकाळच्या सत्रात चढ्या दराने फुलांची विक्री केल्यानंतर दुपारी विके्रत्यांनी दरात मोठी घट केली. त्यानंतरही अनेकांकडे फुले शिल्लक राहिल्याने सायंकाळनंतर ते तसेच सोडून निघून गेले. त्यावर जनावरांनी ताव मारला.
झेंडूच्या फुलांनी बाजारपेठ फुलली
खरेदीसाठी दिवसभर गर्दी : दहा लाखांची झाली उलाढाल
By admin | Updated: October 4, 2014 23:41 IST2014-10-04T23:41:56+5:302014-10-04T23:41:56+5:30
खरेदीसाठी दिवसभर गर्दी : दहा लाखांची झाली उलाढाल
