Lokmat Money > बिझनेस न्यूज > बाजारात मरगळ; सेन्सेक्स ११ अंकांनी घसरला

बाजारात मरगळ; सेन्सेक्स ११ अंकांनी घसरला

कारखाना उत्पादनाची आकडेवारी जाहीर होण्याआधी शुक्रवारी बाजारात मरगळ दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ११.९६ अंकांच्या घसरणीसह २५,६१0.२१ अंकांवर

By admin | Updated: September 12, 2015 03:33 IST2015-09-12T03:33:26+5:302015-09-12T03:33:26+5:30

कारखाना उत्पादनाची आकडेवारी जाहीर होण्याआधी शुक्रवारी बाजारात मरगळ दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ११.९६ अंकांच्या घसरणीसह २५,६१0.२१ अंकांवर

Market fades away; The Sensex dropped by 11 points | बाजारात मरगळ; सेन्सेक्स ११ अंकांनी घसरला

बाजारात मरगळ; सेन्सेक्स ११ अंकांनी घसरला

मुंबई : कारखाना उत्पादनाची आकडेवारी जाहीर होण्याआधी शुक्रवारी बाजारात मरगळ दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ११.९६ अंकांच्या घसरणीसह २५,६१0.२१ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने मात्र १.२0 अंकांची नाममात्र वाढ नोंदविली.
शुक्रवारी बाजार मरगळ दिसून आली असली तरी, साप्ताहिक कामगिरीचा विचार करता, गेल्या पाच आठवड्यांत पहिल्यांदाच दोन्ही निर्देशांकांनी साप्ताहिक वाढ नोंदविली आहे. कमी झालेला मान्सून आणि भांडवलाचे निरंतर बहिर्गमन याचा फटका बाजाराला बसल्याचे जाणकारांनी सांगितले. जाणकारांच्या मते, आज सायंकाळी औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी जाहीर होणार होती.
त्यामुळे बाजारात सकाळपासूनच सतर्क वातावरण होते. त्याचा परिणाम म्हणून बाजार सतत खाली-वर होताना दिसून आला.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी तेजीसह उघडला होता. नंतर तो २५,८७५.९६ अंकांच्या उंचीपर्यंत वर चढला होता. तथापि, ही पातळी त्याला कायम राखता आली नाही. तो २५,५३0.४१ अंकांपर्यंत खाली घसरला. सत्राच्या अखेरीस ११.९६ अंकांच्या अथवा 0.0५ टक्क्यांच्या घसरणीसह तो २५,६१0.२१ अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा व्यापक आधारावरील निफ्टी १.२0 अंकांनी अथवा 0.0२ टक्क्यांनी वाढून ७,७८९.३0 अंकांवर बंद झाला. त्याआधी निफ्टी दिवसभर अस्थिर असल्याचे दिसून आले. तो सतत खाली-वर होत होता.
धातू, भांडवली वस्तू, वाहन, तेल व गॅस आणि ऊर्जा या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नफा वसुली झाली. त्यामुळे बाजारात घसरण झाली.
शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स ४0८.३१ अंकांनी अथवा १.६२ टक्क्यांनी वाढला. त्याच वेळी एनएसई निफ्टी १३४.२५ अंकांनी अथवा १.७५ टक्क्यांनी वाढला. गेल्या चार आठवड्यांपासून सुरू असलेल्या साप्ताहिक घसरणीचा सिलसिला या तेजीने थांबला. ब्रोकरांनी सांगितले की, अन्य आशियाई बाजारांतील कमजोर कल आणि युरोपीय बाजारांची खालच्या स्तरावरील सुरुवात यामुळे बाजारातील धारणेवर परिणाम झाला, असे बाजारातील जाणकारांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

Web Title: Market fades away; The Sensex dropped by 11 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.