Lokmat Money > बिझनेस न्यूज > नफा कमविण्यासाठीच्या विक्रीने बाजार घसरला

नफा कमविण्यासाठीच्या विक्रीने बाजार घसरला

दोन सप्ताहांच्या तेजीनंतर गुंतवणूकदारांनी नफा कमविण्यासाठी केलेली विक्री त्याच्याच जोडीला युरोपमधील शेअर बाजारांमधील मंदी,

By admin | Updated: April 20, 2015 00:10 IST2015-04-20T00:10:46+5:302015-04-20T00:10:46+5:30

दोन सप्ताहांच्या तेजीनंतर गुंतवणूकदारांनी नफा कमविण्यासाठी केलेली विक्री त्याच्याच जोडीला युरोपमधील शेअर बाजारांमधील मंदी,

The market collapsed due to profit making sales | नफा कमविण्यासाठीच्या विक्रीने बाजार घसरला

नफा कमविण्यासाठीच्या विक्रीने बाजार घसरला

दोन सप्ताहांच्या तेजीनंतर गुंतवणूकदारांनी नफा कमविण्यासाठी केलेली विक्री त्याच्याच जोडीला युरोपमधील शेअर बाजारांमधील मंदी, टीसीएसचे निकाल यांचा बाजारावर नकारात्मक परिणाम होऊन निर्देशांकांमध्ये घसरण झाली. बाजारावर आलेल्या विक्रीच्या दडपणाने निर्देशांक घसरले. सप्ताहाच्या अखेरीस जाहीर झालेले रिलायन्सचे निकाल आशादायक आहेत.
मुंबई शेअर बाजारामध्ये गतसप्ताह घसरणीचाच राहिला. बाजारामध्ये सर्वत्रच मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्यामुळे दररोज निर्देशांक खाली आला. सप्ताहाच्या अखेरीस बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ४३७ अंश म्हणजे १.५ टक्क््यांनी घसरून २८४४२.१० अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)दोन टक्क््यांनी म्हणजेच १७४ अंशांनी घसरला. हा निर्देशांक ८६०६ अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या निर्देशांकानाही विक्रीची झळ बसून ते खाली आले. मंगळवारी डॉ.आंबेडकर जयंतीमुळे बाजाराला सुटी होती.त्यामुळे बाजारातील कामकाजाचे दिवस कमी राहिले. औषधनिर्मिती आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला कमी प्रमाणात नफा होत असल्याने या समभागांमधून बाहेर पडण्याचे धोरण गुंतवणूकदारांनी स्वीकारले. परिणामी बाजारावर विक्रीचे मोठे दडपण येऊन निर्देशांक खाली आला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील टीसीएस या आस्थापनेचे जाहीर झालेले निकाल बाजाराच्या अपेक्षेनुसार न आल्याने बाजाराच्या घसरगुंडीला अधिकच वेग आला.
निर्देशांकांमधील समभागांपेक्षा मिडकॅप आणि स्मॉलकॅप क्षेत्रांमधील आस्थापनांना अधिक प्रमाणात भाव आणि व वृद्धी मिळत असल्याने त्यांच्याकडे गुंतवणूकदारांचा वाढता ओढा आहे. दोन सप्ताहांमध्ये वाढलेल्या भावांमुळे गुंतवणूकदारांनी नफा कमविण्याचा मार्ग स्वीकारला आणि बाजाराची अधिकच घसरण झाली.
युरोपमधील ग्रीसवरचे आर्थिक संकट आणखी गहिरे होत असून या देशाची अर्थव्यवस्था वाचविण्याचे आव्हान आता युरोपियन देशांपुढे असल्याने युरोपमधील शेअर बाजार मंदीत राहिले. त्याचाही प्रभाव जगभरातील बाजारांवर पडला.
सप्ताहाच्या अखेरीस जाहीर झालेले रिलायन्स इंडस्ट्रीज या आस्थापनेचे निकाल अपेक्षेपेक्षा अधिक चांगले आले आहेत. याचा चांगला परिणाम आगामी सप्ताहामध्ये बाजारावर झालेला दिसेल. सोमवारपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या अधिवेशनामुळेही बाजाराने सावध भूमिका घेतलेली दिसून येत आहे.

Web Title: The market collapsed due to profit making sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.