नवी दिल्ली : सेन्सेक्सवरील प्रमुख १० पैकी ८ कंपन्यांच्या बाजार भांडवलात गेल्या आठवड्यामध्ये वाढ नोंदली गेली. यात ७५,२५९ कोटी रुपयांची वाढ झाली असून याचा सर्वाधिक लाभ आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी व एसबीआय यांना झाला.
आयटीसी व इन्फोसिस वगळता शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात उर्वरित आठ कंपन्यांच्या भांडवलात वाढ नोंदली गेली. यात टीसीएस, आरआयएल, कोल इंडिया, एचडीएफसी बँक व एल अॅण्ड टी या कंपन्यांचा समावेश आहे. इन्फोसिसचे बाजार भांडवल ४,१६८.९५ कोटींनी कमी होऊन १,८६,८१०.५१ कोटी रुपये झाले आणि आयटीसीचे भांडवल १,५१२.१ कोटींनी घटून २,७३,८८८.९६ कोटी रुपये झाले. प्रमुख १० कंपन्यांच्या यादीत टीसीएस पहिल्या स्थानावर राहिली. यानंतर ओएनजीसी, आरआयएल, आयटीसी, कोल इंडिया, एचडीएफसी बँक, एसबीआय, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक आणि लार्सन अॅण्ड टुब्रो यांचा क्रमांक राहिला. गेल्या आठवड्यात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६१७.२१ अंकांनी वधारून २५,६४१.५६ अंकांवर बंद झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
तेजीमुळे आठ कंपन्यांचे बाजारातील भांडवल ७५,२५९ कोटींनी वाढले
सेन्सेक्सवरील प्रमुख १० पैकी ८ कंपन्यांच्या बाजार भांडवलात गेल्या आठवड्यामध्ये वाढ नोंदली गेली. यात ७५,२५९ कोटी रुपयांची वाढ झाली
By admin | Updated: July 21, 2014 02:29 IST2014-07-21T02:29:59+5:302014-07-21T02:29:59+5:30
सेन्सेक्सवरील प्रमुख १० पैकी ८ कंपन्यांच्या बाजार भांडवलात गेल्या आठवड्यामध्ये वाढ नोंदली गेली. यात ७५,२५९ कोटी रुपयांची वाढ झाली
