मंद्रे : पाळीव प्राण्यात कुत्रा हा इमानी असतो असे म्हटले जाते, त्याचा प्रत्यय नुकताच मांद्रे-मधलामाज येथील घटनेने आला. कुत्रा आपल्या इमानी स्वभावाने घरातील कुटुंबाला लळा लावून जातो. तो ‘पोपूश’ नावाचा कुत्रा घरातून हरवतो काय? आणि त्या कुटुंबाची अवस्था अगदी घरात शोककळा पसरल्यासारखी होते काय. ना धड अन्नाचा कण पोटात जात, कुत्र्याच्या आठवणीने मन व्याकुळ. मनाची घालमेल व कुटुंबाचा हताशपणा. त्या कुत्र्याची कुटुंबियाकडून शोधाशोध चालूच आहे. पोपूश नावाचा इमानी कुत्रा दाखवून देणार्यास घर मालक श्ॉमसन मास्कारेन्हस यांनी 5 हजाराचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. कुत्र्याचे मालक मास्कारेन्हस यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे घर मांद्रे-मधलामाज येथील बाजारात रस्त्यालगतच आहे. सात दिवसाच्या गणपती विसर्जनावेळी लावण्यात आलेल्या दारू सामानाच्या आतषबाजीच्या आवाजाने गोंधळला व घरातून पळाला तो अद्याप घरी फिरकलाच नाही. कोण सांगेल तिथे जाणून शोध घेतला; परंतु पोपूश सापडलाच नाही. तो म्हणतो की कुत्रा आमच्या कुटुंबाचा जीव की प्राण होता. परकी माणसाच्या म्हणजे बिगर गोमंतकीय व्यक्तीना तो अंगणातच फिरकायला देत नव्हता. देवाला नमस्कार करायचा. घरात आलेल्या लहान मुलांच्या सोबत राहून त्याची पाठराखण करायचा. त्या कुत्र्याच्या शोधासाठी आम्हाला पैशाची पर्वा नाही. त्याच्या जाण्याने घरातील माणसे हवालदिल बनली असल्याचे मास्कारेन्हस पाणावलेल्या डोळ्यांनी सांगत होते. कुत्रा हरवल्याची तक्रार मास्कारेन्हस यांनी शिवोली पोलीस स्थानकावर दिल्याचे ते म्हणाले. कुत्रा अंगाने गव्हाळी रंगाचा आहे. गळ्यात तपकीरी प?ा आहे. कुत्रा बुटका आहे कोणालाही तो दिसल्यास किंवा आढळल्यास त्यांनी शिवोली पोलीस स्थानक किंवा मालक श्ॉमसन मास्कारेन्हस यांच्याकडे संपर्क साधावा. (प्रतिनिधी) फोटो : मांद्रे-मधलामाज येथून हरवलेला श्ॉमसन यांचा पोपूश नावाचा इमानी कुत्रा. (1109-एमएपी-02)
मांद्रे कुत्रा
मांद्रे : पाळीव प्राण्यात कुत्रा हा इमानी असतो असे म्हटले जाते, त्याचा प्रत्यय नुकताच मांद्रे-मधलामाज येथील घटनेने आला. कुत्रा आपल्या इमानी स्वभावाने घरातील कुटुंबाला लळा लावून जातो. तो ‘पोपूश’ नावाचा कुत्रा घरातून हरवतो काय? आणि त्या कुटुंबाची अवस्था अगदी घरात शोककळा पसरल्यासारखी होते काय. ना धड अन्नाचा कण पोटात जात, कुत्र्याच्या आठवणीने मन व्याकुळ. मनाची घालमेल व कुटुंबाचा हताशपणा. त्या कुत्र्याची कुटुंबियाकडून शोधाशोध चालूच आहे. पोपूश नावाचा इमानी कुत्रा दाखवून देणार्यास घर मालक श्ॉमसन मास्कारेन्हस यांनी 5 हजाराचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. कुत्र्याचे मालक मास्कारेन्हस यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे घर मांद्रे-मधलामाज येथील बाजारात रस्त्यालगतच आहे. सात दिवसाच्या गणपती विसर्जनावेळी लावण्यात आलेल्या दारू सामानाच्या आतषबाजीच्या आवाजाने गोंधळला व घरातून पळाला त्
By admin | Updated: September 13, 2014 22:59 IST2014-09-13T22:59:20+5:302014-09-13T22:59:20+5:30