विश्वास पुरोहित, बंगळुरू
भारतीय बाजारपेठेत भरपूर संधी असून केंद्र सरकारची मेक इन इंडिया ही मोहीम देशातील उद्योगधंद्यांना चालना देण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे असे मत बीएमडब्ल्यू समूहाचे भारतातील प्रमुख फिलीप वॉन सार यांनी मांडले आहे.
बेंगळुरु येथे नुकतेच बीएमडब्ल्यूच्या आॅल न्यू एक्स ६ या गाडीचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी फिलीप सार यांनी मेक इन इंडिया मोहीमेचे स्वागत केले. चीन, रशियाच्या अर्थव्यवस्थेत सध्या घसरण झाली आहे. भारतीय बाजारपेठेतील ग्राहकांची वाढती मागणी बघता देशात उद्योगधंद्यांना चालना मिळू शकते व यासाठी मेक इन इंडिया उपयुक्त ठरु शकते असा आशावद त्यांनी व्यक्त केला. दक्षिण आशियातील प्रमुख उत्पादन केंद्र होण्याची क्षमताही भारतात आहे असे भाकित त्यांनी वर्तवले.
सार म्हणाले की भारत सरकारने ही मोहीम सुरु करण्यापूर्वीच आम्ही चेन्नईत प्रकल्प सुरु केला. या प्रकल्पात दर वर्षाला बीएमडब्ल्यूच्या आठ प्रकारच्या सुमारे १४ हजार गाड्यांचे उत्पान होते.
मेक इन इंडिया सकारात्मक पाऊल -फिलीप सार
भारतीय बाजारपेठेत भरपूर संधी असून केंद्र सरकारची मेक इन इंडिया ही मोहीम देशातील उद्योगधंद्यांना चालना देण्याच्या दिशेने एक
By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST2015-07-25T01:14:32+5:302015-07-25T01:14:32+5:30
भारतीय बाजारपेठेत भरपूर संधी असून केंद्र सरकारची मेक इन इंडिया ही मोहीम देशातील उद्योगधंद्यांना चालना देण्याच्या दिशेने एक
