Lokmat Money > बिझनेस न्यूज > मतिमंद आदित्यची जलतरणमध्ये उत्कृष्ट कामगिरी

मतिमंद आदित्यची जलतरणमध्ये उत्कृष्ट कामगिरी

कोल्हापूर : आवड आणि जिद्द असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही, असे नेहमी म्हटले जाते. याची प्रचिती आदित्य कुलकर्णीला पाहिल्यानंतर येते. जिज्ञासा संचलित राही पुनर्वसन केंद्राचा हा मतिमंद विद्यार्थी. जलतरणाबरोबरच धावणे, क्रिकेट, संगीत यामध्ये त्याला खास रूची आहे. शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमातही त्याने आपला ठसा उमटविला आहे. आदित्य जलतरणमध्ये सातत्याने सराव करीत आहे. त्यामुळेच तो जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धेत रौप्य आणि कांस्यपदकाचा मानकरी ठरला. आंतरराष्ट्रीय स्पेशल ऑलिम्पिकमध्ये त्याने ५० मी., २५ मी. जलतरणमध्ये चौथा क्रमांक पटकावला आहे. कोल्हापूरसह सोलापूर, पुणे, मुंबई येथील स्पर्धेतही त्याने चमक दाखविली. आदित्य चांगल्याप्रकारे तबलावादन करतो. मतिमंद असूनही सर्वच बाबतीत सरस असल्याचे त्याने सिद्ध केले आहे.

By admin | Updated: December 2, 2014 23:30 IST2014-12-02T23:30:32+5:302014-12-02T23:30:32+5:30

कोल्हापूर : आवड आणि जिद्द असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही, असे नेहमी म्हटले जाते. याची प्रचिती आदित्य कुलकर्णीला पाहिल्यानंतर येते. जिज्ञासा संचलित राही पुनर्वसन केंद्राचा हा मतिमंद विद्यार्थी. जलतरणाबरोबरच धावणे, क्रिकेट, संगीत यामध्ये त्याला खास रूची आहे. शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमातही त्याने आपला ठसा उमटविला आहे. आदित्य जलतरणमध्ये सातत्याने सराव करीत आहे. त्यामुळेच तो जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धेत रौप्य आणि कांस्यपदकाचा मानकरी ठरला. आंतरराष्ट्रीय स्पेशल ऑलिम्पिकमध्ये त्याने ५० मी., २५ मी. जलतरणमध्ये चौथा क्रमांक पटकावला आहे. कोल्हापूरसह सोलापूर, पुणे, मुंबई येथील स्पर्धेतही त्याने चमक दाखविली. आदित्य चांगल्याप्रकारे तबलावादन करतो. मतिमंद असूनही सर्वच बाबतीत सरस असल्याचे त्याने सिद्ध केले आहे.

Maitendam Aditya's excellent performance in Swimming | मतिमंद आदित्यची जलतरणमध्ये उत्कृष्ट कामगिरी

मतिमंद आदित्यची जलतरणमध्ये उत्कृष्ट कामगिरी

ल्हापूर : आवड आणि जिद्द असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही, असे नेहमी म्हटले जाते. याची प्रचिती आदित्य कुलकर्णीला पाहिल्यानंतर येते. जिज्ञासा संचलित राही पुनर्वसन केंद्राचा हा मतिमंद विद्यार्थी. जलतरणाबरोबरच धावणे, क्रिकेट, संगीत यामध्ये त्याला खास रूची आहे. शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमातही त्याने आपला ठसा उमटविला आहे. आदित्य जलतरणमध्ये सातत्याने सराव करीत आहे. त्यामुळेच तो जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धेत रौप्य आणि कांस्यपदकाचा मानकरी ठरला. आंतरराष्ट्रीय स्पेशल ऑलिम्पिकमध्ये त्याने ५० मी., २५ मी. जलतरणमध्ये चौथा क्रमांक पटकावला आहे. कोल्हापूरसह सोलापूर, पुणे, मुंबई येथील स्पर्धेतही त्याने चमक दाखविली. आदित्य चांगल्याप्रकारे तबलावादन करतो. मतिमंद असूनही सर्वच बाबतीत सरस असल्याचे त्याने सिद्ध केले आहे.

फोटो - ०२ आदित्य कुलकर्णी

Web Title: Maitendam Aditya's excellent performance in Swimming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.