महावितरणला ऊर्जा संवर्धनसाठी प्रथम पुरस्कार
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:19+5:302014-12-12T23:49:19+5:30

महावितरणला ऊर्जा संवर्धनसाठी प्रथम पुरस्कार
>नागपूर : ऊर्जा संवर्धनात भरीव कामगिरी केल्याबद्दल भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन-२०१४ च्या प्रथम राष्ट्रीय पुरस्कारासाठी महावितरणची निवड केली आहे. १४ डिसेंबर हा दिवस देशात राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित एका समारंभात केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते या पुरस्कराचे वितरण करण्यात येणार आहे. महावितरणच्यावतीने संचालक (प्रकल्प) प्रभाकर शिंदे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. महावितरणने गावठाणसाठी स्वतंत्र फिडर्स व सिंगल फेजिंगच्या मदतीने सुमारे ३००० ते ३५०० मे.वॉ. विजेच्या मागणीचे व्यवस्थापन केले. याशिवाय अनावश्यक विजेचा वापर टाळून वीज बचत करावी यासाठी महावितरणतर्फे शाळा-कॉलेजात विशेष अभियान राबविण्यात आलेले आहे. महावितरणने केलेल्या या कामगिरीची दखल घेऊन या पुरस्कारसाठी महावितरणची निवड करण्यात आलेली आहे.