Lokmat Money > बिझनेस न्यूज > मॅगी नूडल्सला ‘क्लीन चिट’ नाही

मॅगी नूडल्सला ‘क्लीन चिट’ नाही

बंदी घालण्यात आलेल्या नेस्लेच्या मॅगी नूडल्सला क्लीन चिट देण्यात आलेली नाही, असे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) स्पष्ट केले आहे.

By admin | Updated: August 5, 2015 22:45 IST2015-08-05T22:45:34+5:302015-08-05T22:45:34+5:30

बंदी घालण्यात आलेल्या नेस्लेच्या मॅगी नूडल्सला क्लीन चिट देण्यात आलेली नाही, असे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) स्पष्ट केले आहे.

Maggie noodles does not have a 'clean chit' | मॅगी नूडल्सला ‘क्लीन चिट’ नाही

मॅगी नूडल्सला ‘क्लीन चिट’ नाही

नवी दिल्ली : बंदी घालण्यात आलेल्या नेस्लेच्या मॅगी नूडल्सला क्लीन चिट देण्यात आलेली नाही, असे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) स्पष्ट केले आहे.
गोव्यातील फूड अँड ड्रग्ज लॅबोरेटोरी आणि म्हैसूरस्थित सीएफटीआरआय या दोन प्रयोगशाळांचे निष्कर्ष भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने फेटाळून लावले आहे. एफएसएसएआयने जारी केलेल्या निवेदनात या प्रयोगशाळांच्या तपासणी निष्कर्षात विसंगती असल्याचे म्हटले आहे.
ब्रिटन आणि सिंगापूरच्या प्रयोगशाळांनी मॅगी नूडल्सला दिलेल्या क्लीन चिटबाबतही एफएसएसएआयने साशंकता व्यक्त केली आहे. या कंपनीने विदेशातील तपासणी अहवाल दिलेला
नाही.
गोवा आणि म्हैसूरमधील प्रयोगशाळांच्या अहवालासंदर्भात एफएसएसएआयने स्पष्ट म्हटले आहे की, एफएसएसएआयने मॅगी नूडल्स सुरक्षित असल्याबाबत क्लीन चिट दिलेली नाही. गोव्यात ज्या नमुन्यांचे परीक्षण करण्यात आले , ते नमुने नेस्लेच्या गोव्यातील कारख्यानातील होते.

Web Title: Maggie noodles does not have a 'clean chit'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.