कगल : हळदी (ता. कागल) येथील गरीब मगदूम कुटुंबीयांच्या मालकीची जागा बळजबरीने ताब्यात घेण्याच्या हळदी ग्रामपंचायतीच्या कृत्याच्या निषेधार्थ येथील पंचायत समितीसमोर ऐन निवडणुकीच्या धामधुमीत मगदूम कुटंुबीय आणि किसान सभेचे कार्यकर्ते बेमुदत धरणे आंदोलन करीत असून, प्रशासन वगळता कोणत्याही राजकीय नेत्याने, उमेदवाराने याची दखल घेतलेली नाही. हळदी येथील बाजीराव मगदूम यांची घराला लागून असलेली जवळपास दीड गुंठे जमीन ग्रामपंचायत व गावातील काही लोक हडप करण्यासाठी वर्षभर या कुटंुबाला त्रास देत आहेत. गावाच्या हितासाठी जागा द्या, असा देखावा करून या गरीब कुटंुबाला सतावत आहेत. बाजीराव मगदूम हे एक मुलगी, पत्नी यांच्यासह येथे राहतात. या कुटुंबाने पंचायत समितीकडे दाद मागितली आहे. असे असताना आचारसंहिता सुरू असताना ग्रामपंचायतीने या जागेवर मुरुम-दगडांचा गराडा टाकला आहे. म्हणून किसान सभेचे कार्यकर्ते तुळशीदास किल्लेदार यांनी मगदूम कुटंुबीयांसमवेत पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केले आहे. यामध्ये बाजीराव मगदूम, त्रिवेणी मगदूम, बाळासाहेब कामते, आनंदा कांबळे, गौतम कांबळे, श्रमिक मुक्ती दलाचे अशोक जाधव, संगीता कामते सहभागी झाले आहेत. आशा वर्क्स संघटनेच्या मनीषा पाटील, सुप्रिया बधुले, लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे कॉ. शिवाजी मगदूम, सर्जेराव कांबळे, विद्रोही विद्यार्थी संघटनेने पाठिंबा दिला आहे. फोटो - मेल ओळी - हळदी ग्रामपंचायतीने गरीब कुटंुबीयांची जागा हडप करण्याचा प्रयत्न सुरू केल्याच्या निषेधार्थ कागल पंचायत समितीसमोर धरणे आंदोलनास बसलेले मगदूम कुटंुबीय आणि किसान सभेचे कार्यकर्ते.
हळदी ग्रामपंचायतीच्या निषेधार्थ मगदूम कुटंुबीयांचे उपोषण
कागल : हळदी (ता. कागल) येथील गरीब मगदूम कुटुंबीयांच्या मालकीची जागा बळजबरीने ताब्यात घेण्याच्या हळदी ग्रामपंचायतीच्या कृत्याच्या निषेधार्थ येथील पंचायत समितीसमोर ऐन निवडणुकीच्या धामधुमीत मगदूम कुटंुबीय आणि किसान सभेचे कार्यकर्ते बेमुदत धरणे आंदोलन करीत असून, प्रशासन वगळता कोणत्याही राजकीय नेत्याने, उमेदवाराने याची दखल घेतलेली नाही.
By admin | Updated: October 4, 2014 22:55 IST2014-10-04T22:55:30+5:302014-10-04T22:55:30+5:30