Lokmat Money > बिझनेस न्यूज > आलिशान गाड्या स्वस्ताईच्या वळणावर

आलिशान गाड्या स्वस्ताईच्या वळणावर

मर्सिडिज बेन्झ, बीएमडब्ल्यू, जॅग्वॉर या आणि अशा सारख्या आलिशान गाड्या खरेदी करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे

By admin | Updated: June 12, 2014 00:29 IST2014-06-12T00:29:46+5:302014-06-12T00:29:46+5:30

मर्सिडिज बेन्झ, बीएमडब्ल्यू, जॅग्वॉर या आणि अशा सारख्या आलिशान गाड्या खरेदी करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे

Luxury trains turn cheap | आलिशान गाड्या स्वस्ताईच्या वळणावर

आलिशान गाड्या स्वस्ताईच्या वळणावर

नवी दिल्ली : मर्सिडिज बेन्झ, बीएमडब्ल्यू, जॅग्वॉर या आणि अशा सारख्या आलिशान गाड्या खरेदी करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. ‘डी’ सेगमेंट अर्थात आलिशान श्रेणीतील गाड्यांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात होत असून, या गाड्यांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी वाहनांच्या किमतीत तब्बल १० ते ३० लाख रुपयांची कपात करण्याची तयारी सुरू केली आहे.
अचानक ही जादू झाली कशी, असा प्रश्न जर आपल्याला पडला असेल तर त्याचे उत्तर अगदी सोपे आहे. भारतात प्रकल्प सुरू करण्याची किंमत अन्य देशांच्या तुलनेत कमी असल्याचे तसेच स्वस्तात कौशल्यपूर्ण मनुष्यबळ उपलब्ध होत असल्याने या कंपन्यांनी भारतात सुट्या भागांची निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे.
उत्पादन खर्चात झालेल्या कपातीमुळे ही दर कपात करणे या कंपन्यांना शक्य होत आहे. या कंपन्यांनी प्रामुख्याने गाड्यांमधील इंजिन अथवा अन्य जे महत्वाचे सुटे भाग आहेत, त्यांची निर्मिती भारतात सुरू केली आहे. आजवर हेच भाग परदेशातून आयात करून इथे जोडणी केली जात होती. मात्र, त्या उत्पादनच इथे व्हायला लागल्यामुळे मोठ्या प्रमाणावर खर्चात बचत होत असल्याने ही दरकपात दृष्टिपथात आली आहे. याचसोबत दुसरा मुद्दा म्हणजे, ज्या सुट्या भागांची आयात होते, त्यावर १०० टक्के सीमाशुल्काची आकारणी होते. मात्र, त्याच भागाची देशात निर्मिती झाल्यास कराची टक्केवारी ३० टक्क्यांवर येते.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

 

Web Title: Luxury trains turn cheap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.