Lokmat Money > बिझनेस न्यूज > वस्तू उत्पादनाचा वृद्धीदर नीचांकावर

वस्तू उत्पादनाचा वृद्धीदर नीचांकावर

नोव्हेंबर महिन्यात भारतातील वस्तू उत्पादन क्षेत्राचा वृद्धीदर २५ महिन्यांच्या नीचांकावर गेला आहे. व्यावसायिक आॅर्डरींमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे दर घटल्याचे

By admin | Updated: December 2, 2015 01:01 IST2015-12-02T01:01:22+5:302015-12-02T01:01:22+5:30

नोव्हेंबर महिन्यात भारतातील वस्तू उत्पादन क्षेत्राचा वृद्धीदर २५ महिन्यांच्या नीचांकावर गेला आहे. व्यावसायिक आॅर्डरींमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे दर घटल्याचे

Low growth of goods product | वस्तू उत्पादनाचा वृद्धीदर नीचांकावर

वस्तू उत्पादनाचा वृद्धीदर नीचांकावर

नवी दिल्ली : नोव्हेंबर महिन्यात भारतातील वस्तू उत्पादन क्षेत्राचा वृद्धीदर २५ महिन्यांच्या नीचांकावर गेला आहे. व्यावसायिक आॅर्डरींमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे दर घटल्याचे एका अहवालात आढळून आले आहे.
मार्किट व निक्कई इंडियाने केलेल्या एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली. या अहवालात मासिक पर्चेजिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) काढण्यात आला आहे. त्यानुसार, भारतीय वस्तू उत्पादन क्षेत्राचा वृद्धीदर तर नोव्हेंबरमध्ये सलग चौथ्या महिन्यात घसरला.
ही सलग २५ व्या महिन्यातील घसरण ठरली आहे. वास्तविक या २५ महिन्यांच्या काळात अर्थव्यवस्थेचे स्वास्थ्य थोडे सुधारले आहे. तथापि, ही सुधारणा अत्यंत कमी प्रमाणात आहे.
रिझर्व्ह बँकेने आज धोरणात्मक व्याजदरांत कोणताही बदल केला नाही. त्यामागील तर्कसंगतता विनिर्माण क्षेत्रातील वाढीच्या घसरलेल्या आकड्यांनी दाखवून दिल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

Web Title: Low growth of goods product

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.