नवी दिल्ली : देशांतर्गत कर आकारण्यात न आलेला पैसा आणि संपत्ती जाहीर करू इच्छिणाऱ्यांसाठी आयकर विभागाने शुक्रवारी नोेंदणीकृत मालमत्ता मूल्यांककांची (व्हॅल्युएटर्स) देशव्यापी यादी प्रकाशित केली. आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आलेल्या यादीत अचल संपत्ती, दागिने, प्रकल्प आणि यंत्रसामग्री, शेअर व कर्जरोखे तसेच कृषी जमिनीचे मूल्यांकन करणाऱ्यांची नावे सामील केली आहेत.
‘इन्कमटॅक्सइंडिया डॉट गव्ह डॉट इन’ या आयकर विभागाच्या वेबसाईटवर ही यादी आहे. याच महिन्यात सुरू करण्यात आलेल्या वन टाइम व्यवस्थेअंतर्गत काळा पैसा जाहीर करू इच्छिणाऱ्या लोकांना या वेबसाईटवरील यादीत दिलेले मूल्यांककाचे नाव आणि पत्ता याचा वापर करता येईल. या एक खिडकी व्यवस्थेअंतर्गत १ जून २०१६ च्या बाजारभावाच्या मूल्याच्या आधारावर मालमत्तेचे मूल्यांकन करण्यात
येईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
व्हॅल्युएटर्सची यादी जाहीर
देशांतर्गत कर आकारण्यात न आलेला पैसा आणि संपत्ती जाहीर करू इच्छिणाऱ्यांसाठी आयकर विभागाने शुक्रवारी नोेंदणीकृत मालमत्ता मूल्यांककांची (व्हॅल्युएटर्स) देशव्यापी यादी
By admin | Updated: June 25, 2016 02:53 IST2016-06-25T02:53:56+5:302016-06-25T02:53:56+5:30
देशांतर्गत कर आकारण्यात न आलेला पैसा आणि संपत्ती जाहीर करू इच्छिणाऱ्यांसाठी आयकर विभागाने शुक्रवारी नोेंदणीकृत मालमत्ता मूल्यांककांची (व्हॅल्युएटर्स) देशव्यापी यादी
