अड्रेस अँड हाऊजरचे ग्लोबल सोर्सिंग हेड उदय विद्वांस, एनआरबीचे उपाध्यक्ष (मॅन्युफॅक्चरिंग) हेमंत जोग व ग्रीव्हज कॉटनचे प्रमुख ऑपरेटिंग ऑफिसर अनिल माखलोगा यांनी आपल्या कंपनीची व उत्पादनाची सविस्तर माहिती दिली. केंद्र सरकारने देशभरात समान करप्रणाली लागू करावी, कर्जावरील व्याजदर कमी करावा, पायाभूत सुविधा निर्माण करून दिल्यास येथील मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रही चायनापेक्षा पुढे निघून जाईल, असे विचार सीआयआयच्या एमएसएमईचे पॅनल कन्व्हेनर अनिश राजगोपाल यांनी व्यक्त केले. पहिला मेळावा यशस्वी झाला असून, पुढील मेळावा सप्टेंबरमध्ये भरविण्यात येईल, अशी घोेषणा सीआयआयचे मराठवाडा झोन कौन्सिलचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे यांनी केली. सूत्रसंचालन संदीप नागोरी यांनी केले. चौकट पुढील मेळाव्यात आणखी ६ बड्या कंपन्या सहभागी होणार एनआरबी बेअरिंग्जचे उपाध्यक्ष (मॅन्युफॅक्चरिंग) हेमंत जोग यांनी सांगितले की, औरंगाबादेतील लघु उद्योजक आम्हाला गुणवत्तापूर्ण कम्पोनंटस् तयार करून देतात हे आम्हाला कळाले. तीन कंपन्या मिळून ४० ते ४५ लघु उद्योजकांची निवड केली आहे. चालू आर्थिक वर्षात आम्ही १०० ते १५० कोटींचे कंत्राट या लघु उद्योजकांना देऊ. कम्पोनंटस्चा दर्जा, वेळेच्या आत काम करून देण्यासाठी कटिबद्धता लक्षात घेऊन भविष्यात कंत्राटचा आकडा वाढू शकतो. यामुळे वर्षभरात १ हजार लोकांना रोजगार मिळेल. या मेळाव्याच्या यशस्वीतेमुळे पुढील मेळाव्यात आमच्या सोबत आणखी ६ बड्या कंपन्याही सहभागी होणार असून, यातून लघु उद्योजकांसाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे. ----------चौकट पुढील दीड महिन्यात मिळतील कामे खरेदी-विक्रीदार मेळाव्यात आज तीन बड्या कंपन्यांचे अधिकारी व ८० लघु उद्योजकांची भेट घडवून आणण्यात आली. यातून अधिकार्यांनी ४० ते ४५ लघु उद्योजकांची निवड केली. आता कंपन्यांचे अधिकारी प्रत्यक्षात लघु उद्योजकांच्या वर्कशॉपला भेट देऊन पाहणी करणार आहेत. त्यानंतर प्रायोगिकतत्त्वावर त्यांच्याकडून कम्पोनंटस् तयार करून घेतील. गुणवत्ता पाहून मग पुढील करार केला जाईल. या संपूर्ण प्रक्रियेस दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे.---------कंपन्यांना कोणते लघु उद्योजक हवे ऑटो कम्पोनंटस्, प्लास्टिक मोल्िंडग, इलेक्ट्रोप्लेटिंग, सीएनसी मशिनिंग, हार्डविंग, पॅकिंग, फोर्जिंग्स सेक्टरमध्ये काम करणार्या लघु उद्योजकांची बड्या कंपन्यांना आवश्यकता आहे.
उद्योजकांच्या बातमीला जोड
अँड्रेस अँड हाऊजरचे ग्लोबल सोर्सिंग हेड उदय विद्वांस, एनआरबीचे उपाध्यक्ष (मॅन्युफॅक्चरिंग) हेमंत जोग व ग्रीव्हज कॉटनचे प्रमुख ऑपरेटिंग ऑफिसर अनिल माखलोगा यांनी आपल्या कंपनीची व उत्पादनाची सविस्तर माहिती दिली. केंद्र सरकारने देशभरात समान करप्रणाली लागू करावी, कर्जावरील व्याजदर कमी करावा, पायाभूत सुविधा निर्माण करून दिल्यास येथील मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रही चायनापेक्षा पुढे निघून जाईल, असे विचार सीआयआयच्या एमएसएमईचे पॅनल कन्व्हेनर अनिश राजगोपाल यांनी व्यक्त केले. पहिला मेळावा यशस्वी झाला असून, पुढील मेळावा सप्टेंबरमध्ये भरविण्यात येईल, अशी घोेषणा सीआयआयचे मराठवाडा झोन कौन्सिलचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे यांनी केली. सूत्रसंचालन संदीप नागोरी यांनी केले.
By admin | Updated: July 4, 2014 21:45 IST2014-07-04T21:45:10+5:302014-07-04T21:45:10+5:30