Lokmat Money > बिझनेस न्यूज > करमुक्त उत्पन्नाची मर्यादा २ लाखावरून वाढून २.५ लाख रुपये

करमुक्त उत्पन्नाची मर्यादा २ लाखावरून वाढून २.५ लाख रुपये

सर्वसामान्यांना करसवलतीमध्ये फार दिलासा दिला नसला तरी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा २ लाख रुपयांवरून ५० हजार रुपयांनी वाढवून २.५ लाख रुपये केली आहे.

By admin | Updated: July 10, 2014 13:04 IST2014-07-10T12:59:41+5:302014-07-10T13:04:00+5:30

सर्वसामान्यांना करसवलतीमध्ये फार दिलासा दिला नसला तरी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा २ लाख रुपयांवरून ५० हजार रुपयांनी वाढवून २.५ लाख रुपये केली आहे.

The limit of tax-free income increased from Rs 2 lakh to Rs 2.5 lakh | करमुक्त उत्पन्नाची मर्यादा २ लाखावरून वाढून २.५ लाख रुपये

करमुक्त उत्पन्नाची मर्यादा २ लाखावरून वाढून २.५ लाख रुपये

>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १० - सर्वसामान्यांना करसवलतीमध्ये फार दिलासा दिला नसला तरी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा २ लाख रुपयांवरून ५० हजार रुपयांनी वाढवून २.५ लाख रुपये केली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा २.५ लाख रुपयांवरून वाढवून ३ लाख रुपये केली आहे. तसेच ८० सी अंतर्गत करता येणारी करबचतीसाठी गुंतवणुकीची मर्यादा सध्याच्या एक लाख रुपयांवरुन वाढवून दीड लाख रुपये करण्यात आली आहे. गृहकर्जावरील व्याजावरील करसवलत सध्याच्या दीड लाख रुपयांवरुन दोन लाख रुपये करण्यात आली आहे.
त्याचवेळी पीपीएफमधली गुंतवणुकीची मर्यादाही एक लाख रुपयांवरून वाढवून दीड लाख रुपये केली असल्याने जनतेने पीपीएफमध्ये गुंतवणूक करावी अशी इच्छा सरकारने बजेटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. या तरतुदीमुळे सर्वसामान्य गुंतवणुकीच्या माध्यमातून दरवर्षी पाच हजार रुपये वाचवता येणार आहेत.

Web Title: The limit of tax-free income increased from Rs 2 lakh to Rs 2.5 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.