नवी दिल्ली : लिंबोळी लेपित (नीम कोटेड) युरियाची यापुढे देशात विक्री होईल. या उपाययोजनेमुळे त्याचा वापर कमी करणे व औद्योगिक उपयोगासाठी त्याचा वापर बंद होण्यामुळे जवळपास १० हजार कोटी रुपयांची बचत होईल.
खतमंत्री अनंतकुमार यांनी सांगितले की,‘‘यावर्षी २५ मे रोजी मी युरिया लिंबोळी लेपित करणे बंधनकारक केल्याचा निर्णय घेतला. कारण त्याचा औद्योगिक वापर बंद होईल. हे लक्ष्य विक्रमी १६६ दिवसांत गाठण्यात आले.’’ अनंतकुमार यांच्या माहितीनुसार आयसीएआरसारख्या संस्थांना नीम लेपित युरिया जैविक कीटकनाशक म्हणूनही काम करते, असे आढळले आहे.
१ डिसेंबरपासून देशात जो युरिया (देशी किंवा आयात केलेला) विकला जाईल तो नीम लेपित असेल. आयात केलेल्या युरियाला नीमलेपित करण्यासाठी देशातील प्रमुख १४ बंदरांवर व्यवस्था करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना युरियाच्या टंचाईला तोंड द्यावे लागणार नसल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना अनुदानासह ५,३६० रुपये टन या भावाने युरिया दिला जातो. या आधी स्वस्तातल्या युरियाचा वापर बेकायदेशीरपणे रंग व प्लायवूड उद्योगात केला जायचा. उद्योगासाठीच्या युरियाचा भाव २२ ते २३ हजार रुपये टन असा होता, असे ते म्हणाले. भारतात युरियाची मागणी वर्षाला तीन कोटी टन असून उत्पादन मात्र २.२ कोटी टनांचे आहे. यातील फरक आयातीद्वारे भरून काढला जातो. (प्रतिनिधी)
लिंबोळी लेपित युरियाचीच आता होणार विक्री
लिंबोळी लेपित (नीम कोटेड) युरियाची यापुढे देशात विक्री होईल. या उपाययोजनेमुळे त्याचा वापर कमी करणे व औद्योगिक उपयोगासाठी त्याचा वापर बंद होण्यामुळे जवळपास
By admin | Updated: December 3, 2015 02:02 IST2015-12-03T02:02:11+5:302015-12-03T02:02:11+5:30
लिंबोळी लेपित (नीम कोटेड) युरियाची यापुढे देशात विक्री होईल. या उपाययोजनेमुळे त्याचा वापर कमी करणे व औद्योगिक उपयोगासाठी त्याचा वापर बंद होण्यामुळे जवळपास
