मुंबई: औद्योगिक उत्पादनाची वाढ, तसेच महागाईची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक उच्चांकाच्या जवळपास झेपावला. एचडीएफसी बँकेच्या समभागांनी नेतृत्व केले.
३० समभागांचा मुंबई शेअर बाजार गुरुवारी दिवसभर झालेल्या उलाढालीत चढता राहिला. २०० अंकांची झेप घेत निर्देशांकाने दिवसभराचा उच्चांक गाठला; पण बंद होताना मागे फिरून २५,५७६.२१ वर बंद झाला. ही वाढ १०२.३२ अंकांची किंवा ०.४० टक्के आहे. बुधवारी निर्देशांक १०९.८० अंकांची वा ०.४३ टक्के वाढ होऊन बंद झाला होता.
१० जून रोजी सेन्सेक्सने २५.५८३.६९ अंकांवर झेप घेत उच्चांक गाठला होता. सीएनएक्स निफ्टी व एनएसई या निर्देशांकात २३.०५ अंकांची वा ०.३० टक्के वाढ झाली आहे. औद्योगिक उत्पन्नाची आकडेवारी व किरकोळ महागाईचा दर गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर जाहीर झाला आहे; पण हे दोन्ही दर सकारात्मक असतील अशा अपेक्षेने शेअर बाजाराने झेप घेतली आहे. एचडीएफसी व एचडीएफसी बँकेच्या समभागांना मोठी मागणी राहिली. त्यांनी सेन्सेक्समध्ये ८० अंकांची भर घातली. टीसीएस, सनफार्मा, आयटीसी, टाटा मोटर्स, हिंदाल्को, मारुती सुझुकी व एनटीपीसी या कंपन्यांनाही नफा झाला.
सेन्सेक्सची उच्चांकाच्या जवळ झेप
औद्योगिक उत्पादनाची वाढ, तसेच महागाईची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक उच्चांकाच्या जवळपास झेपावला
By admin | Updated: June 13, 2014 04:19 IST2014-06-13T04:19:01+5:302014-06-13T04:19:01+5:30
औद्योगिक उत्पादनाची वाढ, तसेच महागाईची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक उच्चांकाच्या जवळपास झेपावला
