Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पुढारी, वरिष्ठ अधिकारी गुन्ह्यास प्रवृत्त करतात !

पुढारी, वरिष्ठ अधिकारी गुन्ह्यास प्रवृत्त करतात !

By admin | Updated: September 29, 2014 21:46 IST2014-09-29T21:46:44+5:302014-09-29T21:46:44+5:30

Leaders, senior officials make the crime a crime! | पुढारी, वरिष्ठ अधिकारी गुन्ह्यास प्रवृत्त करतात !

पुढारी, वरिष्ठ अधिकारी गुन्ह्यास प्रवृत्त करतात !

>जिल्हा परिषदेतील अपहार: भास्कर वाघचा कबुली जबाब नोंदवणार्‍या दंडाधिकार्‍यांची साक्ष

धुळे : राजकीय पुढारी व वरिष्ठ अधिकारी गुन्हे करण्यास कसे प्रवृत्त करतात याचे हे प्रकरण एक नमुना असल्याचे येथील जिल्हा परिषद अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी भास्कर वाघ याने आपल्या जबाबात म्हटले असल्याची साक्ष तत्कालीन मुख्य न्यायदंडाधिकारी पी. बी. नायगावकर यांनी सोमवारी न्यायालयात दिली.
मी मोठा गुन्हा केला असून त्याचा मला प›ाताप झाला आहे. मला लोकांची माफी मागायची असल्याचेही त्याने कबुली जबाबात म्हटल्याचे नायगावकर यांनी सांगितले. धुळे जिल्हा परिषदेत १९९० मध्ये २५ कोटी रूपयांचे अपहार प्रकरण उघडकीस आले़ राज्यभर गाजलेल्या या घोटाळ्याच्या विशेष खटल्यातील मुख्य आरोपी भास्कर वाघ याने १९९१ मध्ये तत्कालीन मुख्य न्यायदंडाधिकारी नायगावकर यांच्यासमोर कबुली जबाब दिला होता़ तो त्यांनी नोंदवून घेतला होता़
अपहारप्रकरणी १६ नोव्हेंबर १९९० मध्ये भास्कर वाघला पहिल्यांदा अटक झाली. २० फेब्रुवारी १९९१ पर्यंत वाघ पोलीस कोठडीत होता. वाघला न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर त्याने कबुली जबाब देण्याची इच्छा दर्शवीली़ मी स्वच्छेने जबाब देत असल्याचे वाघ दुसर्‍या दिवशी म्हणाला. त्यानुसार २२ फे ब्रुवारी १९९१ ते १३ मार्च १९९१ दरम्यान कबुली जबाब नोंदविण्यात आला़, असे नायगावकर म्हणाले.
नायगावकर यांची आरोपींच्या वकीलांनी उलटतपासणीही घेतली़ त्यात वाघ यांनी पोलिसांच्या दबावाखाली जबाब दिला का, जबाब घेताना वाघ यांना दोन दिवस वेळ दिली होती का, तसेच कबुली जबाबात कोणाचे नाव टाकले आहे का, असे प्रश्न आरोपींच्या वकिलांनी उपस्थित केले होते.
आरोंपींच्या वकिलांनी कबुली जबाबाची प्रत देण्याची मागणी केली़ तसेच ४६५ पानांच्या कबुली जबाबाचा अभ्यास करण्यासाठी वेळ मागितली़ त्यानुसार पुढील कामकाज ३० ऑक्टोबरला होणार आहे. (प्रतिनिधी)
-------------------

Web Title: Leaders, senior officials make the crime a crime!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.