Lokmat Money > बिझनेस न्यूज > (लिड )महाराष्ट्र पान मस्ट/ राज्यात पावसाची तूट १४ टक्के

(लिड )महाराष्ट्र पान मस्ट/ राज्यात पावसाची तूट १४ टक्के

By admin | Updated: October 4, 2014 22:55 IST2014-10-04T22:55:18+5:302014-10-04T22:55:18+5:30

(Lead) Maharashtra Pan Mustache / State Rainfall 14% | (लिड )महाराष्ट्र पान मस्ट/ राज्यात पावसाची तूट १४ टक्के

(लिड )महाराष्ट्र पान मस्ट/ राज्यात पावसाची तूट १४ टक्के

>राज्यात पाणी रडवणार?
यंदा १४ टक्के कमी पाऊस : सर्वाधिक ४२ टक्के तूट मराठवाड्यात
पुणे: गेल्या ५० वर्षांच्या सरासरी पावसाशी तुलना केली तर यंदा संपूर्ण महाराष्ट्रात १४ टक्के पाऊस कमी झाला आहे आणि पावसाची सर्वाधिक ४२ टक्के तूट मराठवाड्यात आहे, अशी आकडेवारी भारतीय हवामान खात्याने जारी केली आहे. या आकडेवारी वरून आत्ताच उन्हाळ्यातील भिषण दिवसांचा अंदाज येत असून यंदाही पाणी रडवणार का? असा प्रश्न बळीराजाला सतावू लागला आहे.
यंदाच्या नैऋत्य मान्सूनच्या पावसाच्या प्रगतीचा शेवटचा साप्ताहिक अहवाल जारी करताना हवामान खात्याने ही माहिती दिली आहे. त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रात १४ टक्के, मध्य महाराष्ट्रात सात टक्के तर मराठवाड्यात सर्वाधिक म्हणजे ४२ टक्के कमी पाऊस झाला आहे.
संपूर्ण भारताचा विचार केला तर महाराष्ट्राचा समावेश असलेले मध्य भारत क्षेत्र आणि दक्षिणेकडील व्दिपकल्पीय प्रदेशात यंदाच्या पावसाची तूट सर्वात कमी आहे. मध्य भारतात सरासरीहून १० टक्के तर दक्षिण व्दिपकल्पीय प्रदेशात सात टक्के पाऊस कमी झाला आहे. अहवालानुसार जेथे ५० वर्षांच्या दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत पावसाची तूट ५० टक्क्यांहून अधिक आहे त्यांत हरियाणा, चंदिगड, दिल्ली, पंजाब व उत्तर प्रदेशाचा समावेश आहे. वस्तुत: हवामान खात्याने मध्य भारतात सरासरीच्या ९४ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. प्रत्यक्षात झालेला पाऊस याहून चार टक्क्यांनी कमी आहे.
सर्वसाधारणपणे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातून पूर्णपणे माघार घेतो. यंदा मात्र मान्सून राज्याच्या काही भागांमध्ये ऑक्टोबरच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत रेंगाळण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.
संपूर्ण देशाचा विचार केला तर यंदा दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत ८८ टक्के पाऊस झाल्याचे हा अहवाल सांगतो. म्हणजेच संपूर्ण देशात पावसाची सरासरी तूट १२ टक्के आहे. म्हणजेच प्रत्यक्षात झालेला पाऊस आधी वर्तविलेल्या अंदाजाहून सुमारे चार टक्क्यांनी कमी आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: (Lead) Maharashtra Pan Mustache / State Rainfall 14%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.