Lokmat Money > बिझनेस न्यूज > नाईक होमिओपॅथीच्या नवीन शाखेचा शुभारंभ

नाईक होमिओपॅथीच्या नवीन शाखेचा शुभारंभ

गत चार वर्षांपूर्वी नाईक होमिओपॅथीची पौंड रोड येथे पहिली शाखा सुरू झाली होती. पुणेकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता आज पुण्यात रुग्णांच्या सोयीकरिता २१.०८.२०१४ रोजी नाईक होमिओपॅथीच्या चौथ्या शाखेचा शुभारंभ कर्वे रोड, आयुर्वेद रस शाळेसमोर, काका हलवाई यांच्या प्रशस्त जागेत संपन्न झाला.

By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST2014-08-25T21:40:32+5:302014-08-25T21:40:32+5:30

गत चार वर्षांपूर्वी नाईक होमिओपॅथीची पौंड रोड येथे पहिली शाखा सुरू झाली होती. पुणेकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता आज पुण्यात रुग्णांच्या सोयीकरिता २१.०८.२०१४ रोजी नाईक होमिओपॅथीच्या चौथ्या शाखेचा शुभारंभ कर्वे रोड, आयुर्वेद रस शाळेसमोर, काका हलवाई यांच्या प्रशस्त जागेत संपन्न झाला.

Launch of new branch of Naik Homeopathy | नाईक होमिओपॅथीच्या नवीन शाखेचा शुभारंभ

नाईक होमिओपॅथीच्या नवीन शाखेचा शुभारंभ

चार वर्षांपूर्वी नाईक होमिओपॅथीची पौंड रोड येथे पहिली शाखा सुरू झाली होती. पुणेकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता आज पुण्यात रुग्णांच्या सोयीकरिता २१.०८.२०१४ रोजी नाईक होमिओपॅथीच्या चौथ्या शाखेचा शुभारंभ कर्वे रोड, आयुर्वेद रस शाळेसमोर, काका हलवाई यांच्या प्रशस्त जागेत संपन्न झाला.
नाईक होमिओपॅथीसह क्लिनिकमध्ये असाध्य आजारांवर उपचार केले जातात, जसे की किडनीफेल्युअर, हृदयरोग, वंध्यत्व निवारण, सांधेदुखी, सायटीका, स्पॅडिलेसीस, दमा, पोटदुखी, कंबरदुखी, मणक्याचे आजार, चर्मरोग, पाळीचे आजार व इतरही आजारांवर यशस्वीपणे उपचार केले जातात.
वरील कार्यक्रमाचे उद्घाटन कोथरूड मित्रचे संचालक संजय डहाके यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले. या प्रसंगी डॉ.उदय नाईक, डॉ.ऋता श्रीखंडे, डॉ. विकास कराळे, डॉ.नम्रता, डॉ.चैताली गुजर, डॉ.कल्याणी डोरले, प्रवीण देशपांडे व अनेक रुग्ण उपस्थित होते. नाईक होमिओपॅथीचे संचालक डॉ.उदय नाईक यांनी त्यांच्या ३० वर्षाच्या रुग्णसेवेच्या अनुभवाबद्दल माहिती दिली.
नाईक होमिओपॅथी कर्वे रोड येथे होलबॉडी स्कॅन मशीन व कोरीअन मशीन उपलब्ध करण्यात आलेली आहे. बॉडी स्कॅनमध्ये ९७ टेस्ट केल्या जातात. या मशीनद्वारा रुग्णाला त्याचे शरीरात कोणते घटक कमी आहेत. कोणते घटक जास्त आहेत, यांची माहिती मिळू शकते. या अनुषंगाने औषधाची निवड व आहारात बदल करता येतो व त्याचा रुग्णाला लवकर फायदा होतो.बॉडी स्कॅनिंग अत्यल्प खर्चात शक्य आहे. कोरीयन मशीनद्वारा रोज ४० मिनिटे उपचार घेतल्यास पुढील सर्व आजारांवर प्रामुख्याने मणक्यांचे आजार, स्नायूंचे आजार, पोटाचे आजार, लठ्ठपणा यावर उपयुक्त असू शकते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अनिल काळे, भावना नाईक, प्रथमेश नाईक, प्रवीण देशपांडे, डॉ.विकास, डॉ.ऋता श्रीखंडे, डॉ.नम्रता,अनिल वाघ, स्वप्निल शिरसाट, पुनम वानखेडे, सुनील जाधव व नाईक होमिओपॅथीचे क्लिनिक सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे पूजन भूषण व्याघ्रांबरे गुरुजी (अकोला) यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी नाईक होमिओपॅथीचे संचालक डॉ.उदय नाईक यांनी ॲडव्हान्सड होमिओपॅथी, बॉडी स्कॅनिंग व कोरीअन मशीन यांचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन केले आहे. शेवटी कार्यक्रमाची सांगता संजय डहाके व नाईक होमिओपॅथीचे सहकारी यांचे आभार मानून झाली. (जा.पा.)

Web Title: Launch of new branch of Naik Homeopathy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.