नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीदरम्यान म्युच्युअल फंडमध्ये सुमारे 84,क्क्क् गुंतवणूकदारांनी भांडवल लावले. यामुळे देशी शेअर बाजारातील तेजीला बळ मिळाले. पोर्टफोलिओ क्रमांक वेगवेगळ्या गुंतवणूक खात्यांना दिला जातो; मात्र एकच गुंतवणूकदार अनेक फोलिओ घेऊ शकतो.
भारतीय भांडवल बाजार नियामक सेबीच्या आकडेवारीनुसार, एकूण गुंतवणूकदारांत 44 फंड समूहांचा समावेश आहे. जूनअखेरीस यांच्या फोलिओंची संख्या वाढून 2,92,64,713 वर पोहोचली. गेल्या वर्षी याच काळात ती 2,91,8क्,922 एवढी होती. एप्रिल ते जून या तिमाहीदरम्यान, यात 83,791 एवढी वाढ नोंदली गेली.
म्युच्युअल फंडांशी संबंधित उच्चस्तरीय सूत्रंनी सांगितले की, बाजारात रोज नवनवे उच्चंक होत असतानाच ही वाढ नोंदली गेली. मेमध्ये म्युच्युअल फंड फोलिओंची संख्या 2,92,19,875 एवढी होती, एप्रिलअखेरीस ती 2.96 कोटींवर होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)