Lokmat Money > बिझनेस न्यूज > २६२ बड्या कंपन्यांपुढे निधी उभारण्याचे मोठे संंकट

२६२ बड्या कंपन्यांपुढे निधी उभारण्याचे मोठे संंकट

देशातील कर्ज घेतलेल्या ५०० बड्या कंपन्यांपैकी निम्म्या कंपन्यांपुढे निधी कसा उभा करायचा असा प्रश्न उभा ठाकला आहे.

By admin | Updated: December 4, 2014 00:35 IST2014-12-04T00:35:44+5:302014-12-04T00:35:44+5:30

देशातील कर्ज घेतलेल्या ५०० बड्या कंपन्यांपैकी निम्म्या कंपन्यांपुढे निधी कसा उभा करायचा असा प्रश्न उभा ठाकला आहे.

A large conglomerate to raise funds against 262 big companies | २६२ बड्या कंपन्यांपुढे निधी उभारण्याचे मोठे संंकट

२६२ बड्या कंपन्यांपुढे निधी उभारण्याचे मोठे संंकट

मुंबई : देशातील कर्ज घेतलेल्या ५०० बड्या कंपन्यांपैकी निम्म्या कंपन्यांपुढे निधी कसा उभा करायचा असा प्रश्न उभा ठाकला आहे. या कंपन्यांना कर्जमुक्त होण्यासाठी सात हजार अब्ज रुपये (११४ अब्ज डॉलर) किंवा तीन वर्षांच्या मुदतीची गरज आहे, असे इंडिया रेटिंग्जच्या अहवालात म्हटले.
जर कर्जमुक्तीसाठी भाग भांडवलाची रक्कम वापरायची असेल तर बड्या ५०० पैकी २६२ कंपन्यांना किमान ७,०४,३०० कोटी रुपये (११४ अब्ज डॉलर) इक्विटी गुंतवणुकीची गरज आहे. अर्थात एवढी रक्कम उभी करणे हे फार मोठे आव्हान आहे. कारण २००७-२००८ ते २०१३-२०१४ दरम्यान या ५०० कंपन्यांना शेअरद्वारे यातील अर्धीच गुंतवणूक मिळाली आहे. इंडिया रेटिंग्जचे वरिष्ठ संचालक (वित्तीय सेवा) दीप एन. मुखर्जी यांनी एका टिपणीत म्हटले आहे की, जर या कंपन्यांना आपले भाग भांडवल वाढवून आणि कर्जाचा भार कमी करायचा असेल तर त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करायला तीन वर्षे लागतील. पण या कंपन्यांचे कर्ज २०१३-२०१४ वर्षात आहे त्यापेक्षा जास्त वाढले नाही तरच हे शक्य आहे, असेही त्यात म्हटले आहे. अर्थव्यवस्थेत किरकोळ स्वरुपाचीच सुधारणा झाली तर याच प्रक्रियेला पाच ते सहा वर्षेही लागतील, असेही दीप एन. मुखर्जी यांनी स्पष्ट केले.

Web Title: A large conglomerate to raise funds against 262 big companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.