नवी दिल्ली : येत्या १ एप्रिलपासून विशिष्ट रकमेपेक्षा जास्तीची देवघेव केली तर त्याची माहिती विशिष्ट नमुन्यात आयकर खात्याला देणे बंधनकारक आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने नवे नियम अधिसूचित केले असून त्यात ही तरतूद आहे.
नवीन नियमानुसार रोख रक्कम, शेअर्सची खरेदी, म्युचुअल फंड, स्थावर मालमत्ता, विदेशी चलनाची विक्री आदी व्यवहारांची माहिती आयकर खात्याला फॉर्म नं. १६ ए मध्ये द्यावी लागेल. अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेत ही माहिती देऊन म्हटले आहे की, ३० लाखापेक्षा जास्तीच्या स्थावर मालमत्ता खरेदीची सूचनाही खात्याला द्यावी लागेल. एखाद्या व्यक्तीला सेवेबद्दल वा वस्तू विक्रीतून दोन लाखांपेक्षा अधिक रक्कम मिळाली तर त्याचीही माहिती आयकर खात्याला द्यावी लागेल.
अधिसूचनेत म्हटले आहे की, एखाद्या व्यक्तीने एका आर्थिक वर्षात बँकेत एक वा एकापेक्षा जास्त खात्यात १० लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केली तर त्याचीही सूचना द्यावी लागेल. बँकांमधील आवर्ती जमा योजनेला तसेच टपाल कार्यालयातील आवर्ती योजनेला हा नियम लागू राहील.
यावर प्रतिक्रिया देताना नांगिया अँड कंपनीच्या कार्यकारी संचालिका नेहा मल्होत्रा म्हणाल्या की, देशातील काळा पैसा ही मोठी समस्या असून, सरकारने त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. एसआयटीने ज्या शिफारशी केल्या त्यामध्ये मोठ्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे सामील आहे. कारण असे व्यवहार प्रामुख्याने बेकायदा असतात.
लाखावरील व्यवहार रडारवर
येत्या १ एप्रिलपासून विशिष्ट रकमेपेक्षा जास्तीची देवघेव केली तर त्याची माहिती विशिष्ट नमुन्यात आयकर खात्याला देणे बंधनकारक आहे.
By admin | Updated: January 4, 2016 02:32 IST2016-01-04T02:32:18+5:302016-01-04T02:32:18+5:30
येत्या १ एप्रिलपासून विशिष्ट रकमेपेक्षा जास्तीची देवघेव केली तर त्याची माहिती विशिष्ट नमुन्यात आयकर खात्याला देणे बंधनकारक आहे.
