नवी दिल्ली : नोटाबंदीचा मोठा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. विशेषत: भाजीपाला आणि फळांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति एकर २० ते ५० हजार रुपये तोटा सहन करावा लागला आहे. शेतकरी नेते अजय वीर जाखड यांनी सांगितले की, शेतकऱ्यांकडून टोमॅटो, मटार खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांकडे रोख रक्कमच उपलब्ध नव्हती. त्यामुळे फळे, भाजीपाला खराब झाला. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला.
किसान जागृती मंचचे अध्यक्ष सुधीर पनवार म्हणाले की, शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. जर व्यापारी पैसेच नाहीत म्हणत असतील तर माल कवडीमोलाने विकणे अथवा फेकून देणे याशिवाय अन्य पर्यायच शेतकऱ्यांपुढे नाही. कारण, शेतकरी चेकचा वापर करत नाहीत. त्यांनी कॅशलेसची पद्धत अद्याप स्वीकारलेली नाही. नोटाबंदीमुळे रबीच्या हंंगामावरही प्रतिकूल परिणाम झाला आहे. पनवाल म्हणाले की, भाजपचे खासदार आणि किसान मोर्चाचे अध्यक्ष वीरेंद्र सिंग यांनी तर असे विधान केले आहे की, नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचा फिजुल खर्च वाचला आहे. तर, जे शेतकरी दारुवर खर्च करत होते त्यांचा खर्चही आता वाचला आहे. पण, वस्तुस्थिती अशी आहे की, शेतकरी अतिशय अडचणीत आहे.
शेतकऱ्यांना प्रति एकर 50,000 रुपयांचा तोटा
नोटाबंदीचा मोठा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. विशेषत: भाजीपाला आणि फळांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना
By admin | Updated: January 24, 2017 00:44 IST2017-01-24T00:44:36+5:302017-01-24T00:44:36+5:30
नोटाबंदीचा मोठा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. विशेषत: भाजीपाला आणि फळांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना
