Lokmat Money > बिझनेस न्यूज > कामगार नेते भि. र. बावके यांचे निधन

कामगार नेते भि. र. बावके यांचे निधन

र्शीरामपूर (जि. अहमदनगर) : कामगार नेते भिकाजी रंभाजी बावके (82) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी निधन झाले. बावके 1960 पासून कामगार चळवळीत कार्यरत होते. नगर जिल्हा शेतमजूर युनियनची त्यांनी स्थापना केली. कामगारांसाठी लढे देताना त्यांना सहावेळा तुरुंगवास भोगावा लागला. परंतु कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी कधीही माघार घेतली नाही. कृषी विद्यापीठ कामगारांच्या न्यायासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. टाकळीभान टेलटँकसाठी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेले रास्ता रोको आंदोलन राज्यात गाजले होते. 1972 मध्ये दुष्काळात रोजगार हमी योजनेची कामे सुरु व्हावीत यासाठी सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडण्यात त्यांचा सहभाग होता. बावके हे मूळचे राहाता तालुक्यातील साकुरी येथील होते. त्यांची कर्मभूमी मात्र र्शीरामपूर राहिली. त्यांच्या पश्चात पत्नी आस्

By admin | Updated: October 4, 2014 22:55 IST2014-10-04T22:55:51+5:302014-10-04T22:55:51+5:30

र्शीरामपूर (जि. अहमदनगर) : कामगार नेते भिकाजी रंभाजी बावके (82) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी निधन झाले. बावके 1960 पासून कामगार चळवळीत कार्यरत होते. नगर जिल्हा शेतमजूर युनियनची त्यांनी स्थापना केली. कामगारांसाठी लढे देताना त्यांना सहावेळा तुरुंगवास भोगावा लागला. परंतु कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी कधीही माघार घेतली नाही. कृषी विद्यापीठ कामगारांच्या न्यायासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. टाकळीभान टेलटँकसाठी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेले रास्ता रोको आंदोलन राज्यात गाजले होते. 1972 मध्ये दुष्काळात रोजगार हमी योजनेची कामे सुरु व्हावीत यासाठी सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडण्यात त्यांचा सहभाग होता. बावके हे मूळचे राहाता तालुक्यातील साकुरी येथील होते. त्यांची कर्मभूमी मात्र र्शीरामपूर राहिली. त्यांच्या पश्चात पत्नी आस्

Labor leader R Bawke passed away | कामगार नेते भि. र. बावके यांचे निधन

कामगार नेते भि. र. बावके यांचे निधन

शीरामपूर (जि. अहमदनगर) : कामगार नेते भिकाजी रंभाजी बावके (82) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी निधन झाले. बावके 1960 पासून कामगार चळवळीत कार्यरत होते. नगर जिल्हा शेतमजूर युनियनची त्यांनी स्थापना केली. कामगारांसाठी लढे देताना त्यांना सहावेळा तुरुंगवास भोगावा लागला. परंतु कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी कधीही माघार घेतली नाही. कृषी विद्यापीठ कामगारांच्या न्यायासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. टाकळीभान टेलटँकसाठी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेले रास्ता रोको आंदोलन राज्यात गाजले होते. 1972 मध्ये दुष्काळात रोजगार हमी योजनेची कामे सुरु व्हावीत यासाठी सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडण्यात त्यांचा सहभाग होता. बावके हे मूळचे राहाता तालुक्यातील साकुरी येथील होते. त्यांची कर्मभूमी मात्र र्शीरामपूर राहिली. त्यांच्या पश्चात पत्नी आसराबाई, ज्येष्ठ पुत्र राजेंद्र बावके, प्रा. बाळासाहेब बावके, कन्या जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी उज्ज्चला बावके-कोळसे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. (वार्ताहर)

Web Title: Labor leader R Bawke passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.