अकोला : येत्या खरीप हंगामातील कांदा या भाजीपाला पिकाला प्रतिक्ंिवटल १६०० ते १७०० रुपये भाव मिळण्याची शक्यता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्र आणि सांख्यिकी विभाग व केंद्रीय कृषी विपणन केंद्राने वर्तविली आहे. कांदा उत्पादनात भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकावर असून, भारतातील कांद्याला मलेशिया, बांगलादेश, युनायटेड अरब अमिरात, श्रीलंका, पाकिस्तान, इंडोनेशिया आणि नेपाळ या देशांत खूप मागणी आहे.
राष्ट्रीय बागायती संशोधन व विकास संशोधनानुसार महाराष्ट्रात २०१४-१५ मध्ये कांदा लागवडीखालील क्षेत्र ४.५७ दशलक्ष हेक्टर होते, तर उत्पादन ५६.५४ दशलक्ष टन होते. २०१३-१४ मध्ये हेच क्षेत्र ४.६८ दशलक्ष हेक्टर होते, तर उत्पादन ५८.६४ दशलक्ष टन एवढे होते.
यावर्षी अपेक्षित कांद्याचे उत्पन्न व किमतीचा कल या सर्व गोष्टींचा विचार करू न अकोेला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभाग, राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र धोरण संशोधन केंद्र्र व नवी दिल्ली येथील कृषी विपणन केंद्राच्या चमूने नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजारपेठेतील मागील ११ वर्षांच्या कालावधीतील कांदा पिकाच्या मासिक सरासरी किमतीचे पृथक्करण केले आहे.
या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार बाजारातील चालू किमती कायम राहिल्यास सामान्य हवामानात वेगवेगळ््या प्रतवारीनुसार येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात कांंद्याची सरासरी किंमत प्रतिक्विंटल १६०० ते १७०० रुपये राहण्याची शक्यता
आहे.
आयात-निर्यात धोरणात झालेले बदल, तसेच सद्य:स्थितीत हवामानात होणाऱ्या बदलाचा परिणाम कांद्याच्या किमतीवर होऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
खरीप कांद्याला मिळणार १७०० रुपये भाव
येत्या खरीप हंगामातील कांदा या भाजीपाला पिकाला प्रतिक्ंिवटल १६०० ते १७०० रुपये भाव मिळण्याची शक्यता डॉ. पंजाबराव देशमुख
By admin | Updated: July 23, 2015 23:54 IST2015-07-23T23:54:20+5:302015-07-23T23:54:20+5:30
येत्या खरीप हंगामातील कांदा या भाजीपाला पिकाला प्रतिक्ंिवटल १६०० ते १७०० रुपये भाव मिळण्याची शक्यता डॉ. पंजाबराव देशमुख
