Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > फॅब इंडियाला खादी व ग्रामोद्योग आयोगाची नोटीस

फॅब इंडियाला खादी व ग्रामोद्योग आयोगाची नोटीस

खादीच्या नावाखाली सुती तयार कपड्यांची (रेडिमेड गारमेंट्स) विक्री करून ग्राहकांची फसवणूक करीत असल्याबद्दल फॅब इंडियाला खादी व ग्रामोद्योग आयोगाने कायदेशीर नोटीस

By admin | Updated: February 14, 2017 00:25 IST2017-02-14T00:25:16+5:302017-02-14T00:25:16+5:30

खादीच्या नावाखाली सुती तयार कपड्यांची (रेडिमेड गारमेंट्स) विक्री करून ग्राहकांची फसवणूक करीत असल्याबद्दल फॅब इंडियाला खादी व ग्रामोद्योग आयोगाने कायदेशीर नोटीस

Khadi and Village Industries Commission Notice to FAB India | फॅब इंडियाला खादी व ग्रामोद्योग आयोगाची नोटीस

फॅब इंडियाला खादी व ग्रामोद्योग आयोगाची नोटीस

नवी दिल्ली : खादीच्या नावाखाली सुती तयार कपड्यांची (रेडिमेड गारमेंट्स) विक्री करून ग्राहकांची फसवणूक करीत असल्याबद्दल फॅब इंडियाला खादी व ग्रामोद्योग आयोगाने कायदेशीर नोटीस बजावली आहे. फॅब इंडियाकडून १५ दिवसांत समाधानकारक उत्तर न आल्यास कारवाई केली जाईल, असेही खादी व ग्रामोद्योग आयोगाने म्हटले आहे.
आम्हाला आयोगाची नोटीस मिळाली असून, आम्ही कायदेशीर सल्ला घेत आहोत. खादी आयोगाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा करून योग्य तो तोडगा काढू, असे फॅब इंडियाने स्पष्ट केले आहे. फॅब इंडिया हा सध्याच्या तरुणांचा कॉटनमधील अत्यंत लोकप्रिय ब्रॅण्ड आहे.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे कामकाज सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष व्ही. के. सक्सेना म्हणाले की, प्रतिष्ठा जपण्याच्या बाबतीत आम्ही आग्रही आहोत. या सगळ्या प्रकारामुळे ग्रामीण कारागिरांच्या हिताला बाधा पोहोचवण्याचा आणि त्याद्वारे फायदा मिळवण्याचा प्रयत्न झाल्यास किंवा कायद्यांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल. भारतातील खादीचा व्यापार आणि खादी उत्पादनांच्या विक्रीसाठी खादी चिन्ह नियमन कायदा २००३ आणि खादी, ग्रामोद्योग आयोगाच्या कायद्यांतर्गत काही नियम ठरवून देण्यात आले आहेत. त्यानुसार खादीच्या कोणत्याही कापडाची त्यावर खादीचा मार्क असल्याशिवाय विक्री करता येत नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)
कपड्यांवरील उल्लेख काढून टाकण्याची मागणी
कॉटन व खादीचे उत्तम कपडे मिळवण्यासाठी फॅब इंडिया प्रसिद्ध ब्रॅण्ड असून, त्यांची अनेक मोठ्या शहरांमध्ये दुकाने आहेत. परंतु आता फॅब इंडियाला पाठवण्यात आलेल्या नोटिशीमुळे ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. फॅब इंडियाच्या दुकानांत मिळणाऱ्या तयार कपड्यांवर फॅब इंडिया कॉटन असा टॅग असतो.
हा सगळा प्रकार उघडकीस आल्याने खादी व ग्रामोद्योग आयोगाने ही नोटीस पाठवली आहे. यापूर्वीही फॅब इंडियाने आपल्या जाहिरातीत खादीचा उल्लेख केला होता आणि तेव्हाही आयोगाने नोटीस पाठवली होती. त्यानंतर फॅबने जाहिरातीतून खादी हा उल्लेख काढून टाकला.
मात्र त्यांच्या कपड्यांवर खादीचा उल्लेख असल्याने त्याची गंभीर दखल घेऊन खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने
फॅब इंडिया कंपनीचे सीईओ विनय सिंह यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Web Title: Khadi and Village Industries Commission Notice to FAB India