Lokmat Money > बिझनेस न्यूज > केशव शर्मा यांनी स्वीकारली सूत्रे

केशव शर्मा यांनी स्वीकारली सूत्रे

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एअरपोर्ट आॅथोरिटी आॅफ इंडिया) पश्चिम विभागाचे कार्यकारी व्यवस्थापकपदाची सूत्रे केशव शर्मा

By admin | Updated: July 7, 2017 00:57 IST2017-07-07T00:57:46+5:302017-07-07T00:57:46+5:30

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एअरपोर्ट आॅथोरिटी आॅफ इंडिया) पश्चिम विभागाचे कार्यकारी व्यवस्थापकपदाची सूत्रे केशव शर्मा

Keshav Sharma accepted the formulas | केशव शर्मा यांनी स्वीकारली सूत्रे

केशव शर्मा यांनी स्वीकारली सूत्रे

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एअरपोर्ट आॅथोरिटी आॅफ इंडिया) पश्चिम विभागाचे कार्यकारी व्यवस्थापकपदाची सूत्रे केशव शर्मा यांनी येथे स्वीकारली.
ते याआधी अलाहाबादच्या सिविल एविएशन ट्रेनिंग सेंटरचे प्राचार्य होते. शर्मा यांनी १९८५ साली केंद्रीय लोकसेवा आयोमार्फत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयात एरोड्राम आॅफिसर म्हणून कामाला सुरुवात केली. इलेक्ट्रॉनिक्समध्ये मास्टर्स आॅफ सायन्स आणि एमफिल तसेच आयआयटीमधून मास्टर्स इन
मॅनेजमेंट असे शिक्षण घेतलेल्या केशव शर्मा यांचा दिल्ली विमानतळाचे तसेच मुंबई विमानतळाच्या हवाई वाहतूक सेवेचे (एटीएस) आधुनिकीकरण या कामात मोठा वाटा आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोल, एअरपोर्ट मॅनेजमेंट व सेफ्टी मॅनेजमेंट यात ते निष्णात मानले जातात.

Web Title: Keshav Sharma accepted the formulas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.