पढरपूर: हिंदुस्थानी संगीताचा प्रसार करणार्या कलापिनी संगीत विद्यालयाच्यावतीने रविवार दि. 14 सप्टेंबर रोजी पंढरपुरात संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार आहेत. गरजु व होतकरु संगीतप्रेमींना मोफत हिंदुस्थानी संगीताचे शिक्षण देणारे पंडीत दादासाहेब पाटील यांनी 20 वर्षापूर्वी कलापिनीची स्थापना केली आहे. दरवर्षी वार्षिक महोत्सवात अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे. यंदा दिल्ली घरण्याचे तबलावादक पंडीत उमेश मोघे यांचे तबला वादन व मार्गदर्शन होणार आहे. तसेच पं. दादासाहेब पाटील यांच्या शिष्यांच्यावतीने गुरूपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. जयपूर घराण्याच्या आंतराष्ट्रीय ख्यातीच्या गायिका सानिया पाटणकर यांचे शास्त्रीय गायन, अभंग, नाट्यगीत, भजन व ठुमरी गायनाने महोत्सवाचा समारोप होणार आहे. पंढरपूर येथील संत बद्रीनाथ तनपुरे मठ येथे सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत हा कार्यक्रम होईल. महोत्सवासाठी हेरंबराज पाठक, केशव परांजपे,मधूर महाजन, तबलावादक विकास पाटील, अविनाश पाटील या कलाकारांचीही कला सादर होणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पं. दादासाहेब पाटील यांनी केले आहे. फोटो 12 कलापिनी 01 पंडीत उमेश मोघे व02 गायिका सानिया पाटणकर
पंढरपूर येथे रविवारी कलापिनी संगीत महोत्सव
पंढरपूर: हिंदुस्थानी संगीताचा प्रसार करणार्या कलापिनी संगीत विद्यालयाच्यावतीने रविवार दि. 14 सप्टेंबर रोजी पंढरपुरात संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार आहेत.
By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST2014-09-12T22:38:27+5:302014-09-12T22:38:27+5:30
पंढरपूर: हिंदुस्थानी संगीताचा प्रसार करणार्या कलापिनी संगीत विद्यालयाच्यावतीने रविवार दि. 14 सप्टेंबर रोजी पंढरपुरात संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार आहेत.
