नवी दिल्ली : देशात थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) गेल्या जूनमध्ये ६.५ टक्क्यांनी वाढून २.०५ अब्ज डॉलरची झाली. जून २०१४ मध्ये ती १.९२ अब्ज डॉलरची झाली होती. मे महिन्यात ३.८५ अब्ज डॉलरची थेट विदेशी गुंतवणूक झाली.
औद्योगिक नीती आणि संवर्धन विभागाने (डीआयपीपी) दिलेल्या माहितीनुसार यावर्षी एप्रिल ते जून या तीन महिन्यांत एफडीआय ३१ टक्क्यांनी वाढून ९.५० अब्ज डॉलरची झाली. ही गुंतवणूक गेल्यावर्षी याच कालावधीत ७.२३ अब्ज डॉलरची झाली होती.
यावर्षीची थेट विदेशी गुंतवणूक वाहन, व्यापार, सेवा व वीज क्षेत्रात झाली. सर्वाधिक ३.६७ अब्ज डॉलरची थेट विदेशी गुंतवणूक सिंगापूरहून झाली. त्यानंतर मॉरिशस (२.०८ अब्ज डॉलर), नेदरलँड (६५.२ कोटी डॉलर) व अमेरिकेचा (६२.७ कोटी डॉलर) क्रमांक आहे.
जूनमध्ये एफडीआय २.०५ अब्ज डॉलरची
देशात थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) गेल्या जूनमध्ये ६.५ टक्क्यांनी वाढून २.०५ अब्ज डॉलरची झाली. जून २०१४ मध्ये ती १.९२ अब्ज डॉलरची झाली होती
By admin | Updated: August 21, 2015 00:16 IST2015-08-20T22:51:02+5:302015-08-21T00:16:48+5:30
देशात थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) गेल्या जूनमध्ये ६.५ टक्क्यांनी वाढून २.०५ अब्ज डॉलरची झाली. जून २०१४ मध्ये ती १.९२ अब्ज डॉलरची झाली होती
