नवी दिल्ली : स्वस्त स्मार्टफोन व स्वस्त इंटरनेट योजनांचा लाभ घेण्याचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे मोबाईलवर इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या येत्या जूनपर्यंत वाढून २१.३ कोटींवर जाईल.
उद्योग संस्था इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन आॅफ इंडिया अर्थात आयएएमएआय व आयएमआरबी इंटरनॅशनलच्या एका अहवालानुसार, डिसेंबर २०१४ अखेरपर्यंत मोबाईल इंटरनेट ग्राहकांची संख्या १७.३ कोटी होती.
‘ग्रामीण भागात मोठ्या झपाट्याने मोबाईल नेटकरांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागातील मोबाईल नेटकरांची संख्या आॅक्टोबर २०१४ पासून ३३ टक्क्यांनी वाढून मार्च २०१५ पर्यंत ४९ दशलक्षावर जाईल. जून २०१५ पर्यंत ही संख्या ५३ दशलक्ष होईल,’ असा दावा या अहवालात करण्यात आला आहे.
शहरी भागातही मोबाईलद्वारे इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये मोठ्या वेगाने वाढ होत आहे. मार्च २०१५ पर्यंत ही संख्या १४३ दशलक्ष व जून २०१५ पर्यंत १६० दशलक्षावर जाईल.
संघटनेच्या अहवालानुसार, मोबाईल बिल सरासरी १३ टक्क्यांनी वाढून ४३९ रुपये झाले आहे. गेल्या वर्षी मोबाईल इंटरनेटवर ४५ टक्के खर्च झाला आणि यंदा यात वाढ होऊन तो ५४ टक्क्यांवर जाईल. मोबाईल इंटरनेटसाठी खर्च करण्याचे प्रमाणही प्रतिमाह २३५ रुपये या गेल्या वर्षीच्या रकमेच्या तुलनेत ३६ टक्क्यांनी वधारेल.
६३ टक्के मोबाईल इंटरनेट वापरकर्ते प्रतिमाह १०१ ते ५०० रुपये इंटरनेट जोडणीवर खर्च करतात, तर २६ टक्के नेटकर ५०१ ते १,००० रुपये बिल भरतात आणि ७ टक्के वापरकर्ते यावर प्रतिमाह १०० रुपयाहून कमी खर्च करतात. (लोकमत न्यूज नेटवर्क)
जूनपर्यंत २१.३ कोटी मोबाईल ‘नेट’कर
स्वस्त स्मार्टफोन व स्वस्त इंटरनेट योजनांचा लाभ घेण्याचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे मोबाईलवर इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या येत्या जूनपर्यंत वाढून २१.३ कोटींवर जाईल.
By admin | Updated: January 14, 2015 00:00 IST2015-01-14T00:00:57+5:302015-01-14T00:00:57+5:30
स्वस्त स्मार्टफोन व स्वस्त इंटरनेट योजनांचा लाभ घेण्याचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे मोबाईलवर इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या येत्या जूनपर्यंत वाढून २१.३ कोटींवर जाईल.
