नवी दिल्ली : विदेशात जाताना सोबत नेण्यात येणा-या सोन्या-चांदीच्या व अन्य मौल्यवान धातूंच्या दागिन्यांच्या मालकीशी संबंधित मूळ कागदपत्रे आता विमानतळावर सीमा शुल्क विभागाकडे सादर करावी लागणार आहेत. नंतर परत येताना हेच दागिने परत आणावे लागतील, अन्यथा त्यावर नियमानुसार कर लागेल.
सीमा शुल्क विभागाने दागिन्यांसंबंधी नवी नियमावली जारी केली आहे. तसेच विमानतळांवर दागिन्यांच्या मूल्यांकनासाठी विशेष काऊंटरही स्थापन केले आहे. नव्या नियमावलीनुसार, विदेशात जाणाऱ्या प्रवाशांना प्रवासाचे कारण सीमा शुल्क कार्यालयात नोंदवावे लागेल. तसेच सोबत नेलेलेच दागिने आपण परत आणू, असे प्रतिज्ञापत्रही लिहून द्यावे लागेल.
दागिन्यांची मालकी सिद्ध करण्यासाठी खरेदीच्या पावत्या अथवा अन्य कायदेशीर कागदपत्रे सादर करावी लागतील. ही कागदपत्रे नसल्यास दागिन्यांचा स्रोत आणि मालकी आणि मूल्य विशद करणारे शपथपत्र लिहून द्यावे लागेल. प्रवासाच्या १५ दिवस आधी दागिन्यांसंबंधीचे प्रमाणपत्र प्रवाशांना काढून घेता येईल. आयत्या वेळी होणारी धावाधाव टाळण्यासाठी ही सवलत देण्यात आली आहे.
सीमा शुल्ककडून प्रमाणित करून घेण्यासाठी दागिने पारदर्शक आवरणात सोबत आणावी लागतील. प्रमाणित झाल्यानंतर कापड गुंडाळलेल्या वेष्टणात गुंडाळली जातील. कस्टमच्या सीलसह सीमा शुल्ककडून एक प्रमाणपत्र प्रवाशांना दिले जाईल. दागिन्यांचा तपशील असलेली आवश्यक कागदपत्रेही दिली जातील.
दागिन्यांचा विदेशी प्रवास झाला दुस्तर
विदेशात जाताना सोबत नेण्यात येणा-या सोन्या-चांदीच्या व अन्य मौल्यवान धातूंच्या दागिन्यांच्या मालकीशी संबंधित मूळ कागदपत्रे आता विमानतळावर सीमा शुल्क विभागाकडे सादर करावी लागणार
By admin | Updated: January 12, 2015 01:56 IST2015-01-12T01:56:44+5:302015-01-12T01:56:44+5:30
विदेशात जाताना सोबत नेण्यात येणा-या सोन्या-चांदीच्या व अन्य मौल्यवान धातूंच्या दागिन्यांच्या मालकीशी संबंधित मूळ कागदपत्रे आता विमानतळावर सीमा शुल्क विभागाकडे सादर करावी लागणार
