नवी दिल्ली : दागिन्यांवर एक टक्का उत्पादन शुल्क लागू करण्याच्या सरकारच्या प्रस्तावाचा विरोध करण्यासाठी सराफा व्यापाऱ्यांनी सुरू केलेला संप आता ७ मार्चपर्यंत चालणार आहे. संपाचा कालावधी वाढविण्यात येत असल्याची घोषणा आॅल इंडिया जेम्स अॅण्ड ज्वेलर्स ट्रेड फेडरेशनचे प्रमुख जी.बी. श्रीधर यांनी केली.
ते म्हणाले की, रत्न आणि दागिने यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या उत्पादन शुल्काचा मसुदा व्यावहारिकदृष्ट्या लागू करण्यायोग्य नाही. त्याचा उद्योगावर फार प्रतिकूल परिणाम होईल. आम्हाला सरकारकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे; पण आमचे आंदोलन आणि विरोध चालूच राहील. त्यामुळे संपाचा कालावधी ७ मार्चपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सराफा व्यापारी २ मार्चपासून तीन दिवसांच्या संपावर गेले होते. २0१६-१७ च्या अर्थसंकल्पात सरकारने विना इनपुट क्रेडिट आणि रत्न व दागिन्यांवर एक टक्का शुल्क लावले आहे. त्यामुळे इनपूट क्रेडिटसह ते १२.५ टक्के होईल. आॅल इंडिया जेम्स अॅण्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनचे माजी चेअरमन बच्छराज बमालवा यांनी सांगितले की, हे शुल्क सरकारने पुन्हा का लावले हे आम्हाला अद्याप समजलेले नाही. यापूर्वी अशा शुल्कातून महसूल मिळाला नव्हता.
सराफा व्यापाऱ्यांनी बंद वाढविला
दागिन्यांवर एक टक्का उत्पादन शुल्क लागू करण्याच्या सरकारच्या प्रस्तावाचा विरोध करण्यासाठी सराफा व्यापाऱ्यांनी सुरू केलेला संप आता ७ मार्चपर्यंत चालणार आहे
By admin | Updated: March 5, 2016 03:12 IST2016-03-05T03:12:36+5:302016-03-05T03:12:36+5:30
दागिन्यांवर एक टक्का उत्पादन शुल्क लागू करण्याच्या सरकारच्या प्रस्तावाचा विरोध करण्यासाठी सराफा व्यापाऱ्यांनी सुरू केलेला संप आता ७ मार्चपर्यंत चालणार आहे
