जजुरी : ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेला र्मदानी दसरा शुक्रवारी जल्लोषात साजरा झाला. तब्बल 18 तास रंगलेला हा सोहळा हजारो भाविकांना वेगळीच अनुभूती देऊन गेला. सायंकाळी 6 वाजता पेशव्यांच्या इशारतीने सोहळ्याला प्रारंभ झाला. भंडार्याच्या उधळणीत खांदेकरी माणकर्यांनी देवाच्या उत्सव मूर्तीची पालखी उचलली. रात्री 9 वाजता मार्तंड भैरवाचे मूळ ठिकाण कडेपठार मंदिरातील उत्सव मूर्तींचा पालखीसोहळा ही सीमोल्लंघनासाठी निघाला. जेजुरी गडाची पालखी डोंगर उतारावरून खालीदरीत रामण्याकडे उतरत होती, तर कडेपठार पालखी सुसरटिंगीच्या टेकडीवर चढत होती. डोंगराळ भाग असल्याने खांदेकर्यांना पालखी सांभाळण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. रात्री दोनच्या सुमारास आतषबाजीत दोन्ही सोहळ्यातील उत्सवमूर्तींची देवभेट झाली आणि सोहळ्याने माघारीचे प्रस्थान ठेवले. त्यानंतर जेजुरी गडाच्या पालखीचा सीमोल्लंघनातून सोने लुटण्याचा सोहळा रंगला. रमण्यातील तळ्याकाठी सोने लुटून भाविकांनी उत्सव मूर्तींना अर्पण करून दसर्याचे पारंपरिक महत्त्व जपले. पहाटे रावणदहन करण्यात आले. तेथून मुख्य रस्त्याने गडकोटाकडे निघाला. वाटेत घराघरासमोर महिलांनी रांगोळ्या काढून सोहळ्याचे स्वागत केले. सकाळी 7 वाजता पालखी सोहळा गडावर पोहोचला. भंडारगृहात उत्सव मूर्ती विसावल्यानंतर पेशव्यांनी रोजमारा वाटप केले आणि सोहळ्याची सांगता झाली. (प्रतिनिधी)-------------खंडा स्पर्धेत रमेश शेरे प्रथमखंडा (तलवार) कसरत स्पर्धेत सुमारे 42 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यात रमेश शेरे याने 17 मि. 46 सेकंद खंडा तोलून प्रथम क्रमांक मिळवला. अमोल खोमणे (17 मि.17 से.), अंकुश गोडसे (15 मि.52 से.) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. कसरतीच्या स्पर्धेत नितीन कुदळे याने प्रथम, तर हेमंत माने याने दुसरा क्रमांक पटकावला. ---------------फोटो - 04जेजुरी01, 04जेजुरी02-----------------जेजुरीच्या र्मदानी दसरा कार्यक्रमात तलवारीच्या कसरती सादर करताना स्पर्धक. (छाया : बाळासाहेब काळे)
तब्बल 18 तास रंगला जेजुरीचा र्मदानी दसरा
जेजुरी : ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेला र्मदानी दसरा शुक्रवारी जल्लोषात साजरा झाला. तब्बल 18 तास रंगलेला हा सोहळा हजारो भाविकांना वेगळीच अनुभूती देऊन गेला.
By admin | Updated: October 4, 2014 22:55 IST2014-10-04T22:55:35+5:302014-10-04T22:55:35+5:30
जेजुरी : ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेला र्मदानी दसरा शुक्रवारी जल्लोषात साजरा झाला. तब्बल 18 तास रंगलेला हा सोहळा हजारो भाविकांना वेगळीच अनुभूती देऊन गेला.
