नशिक : जयिष्णू आय. आय. टी. गुरुकुल या संस्थेतर्फे नाशिक येथे २१ डिसेंबर रोजी शैक्षणिक सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. ६ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी असून, या यामध्ये त्यांना स्पर्धा परीक्षा व जेईई (मेन आणि ॲडव्हान्स), एनईईटी, अेआयपीएमटी, आयआयटी, एनआयटी एन्टरन्स, बीआयएसएटी एन्टरन्स, व्हेल्लोर एन्टरन्स, एसआरएम एन्टरन्स, एसआयएम एन्टरन्स तसेच गर्व्ह. ग्रान्टेड कॉलेज ऑफ महाराष्ट्र, सीओईपी, व्हीजेटीआय आदि या इंजिनिअरिंग व मेडिकल प्रवेश परीक्षा संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाढता तणाव परीक्षेचे बदलते स्वरूप, सतत बदलणारे अभ्यासक्रम, करिअर बद्दल योग्य मार्गदर्शन या सेमिनारमध्ये करण्यात येईल. सेमिनारमध्ये प्रमुख वक्ते प्रा. दिलीप वाणी सर, प्रा. सविता वाणी असतील. सेमिनारचे आयोजन कुसुमाग्रज स्मारक, विद्याविकास सर्कल, गंगापूररोड, नाशिक-१३. दि. २१ डिसेंबर १४ वेळ ११ ते १ राहील. सेमिनार प्रवेश सर्वांसाठी खुला राहील. तरी सर्व विद्यार्थी व पालकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)
जयिष्णू आय.आय.टी. गुरुकुलतर्फे शैक्षणिक सेमिनार
नाशिक : जयिष्णू आय. आय. टी. गुरुकुल या संस्थेतर्फे नाशिक येथे २१ डिसेंबर रोजी शैक्षणिक सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:51+5:302014-12-20T22:27:51+5:30
नाशिक : जयिष्णू आय. आय. टी. गुरुकुल या संस्थेतर्फे नाशिक येथे २१ डिसेंबर रोजी शैक्षणिक सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
