Lokmat Money > बिझनेस न्यूज > जपान भारताला देणार १४, २५० कोटींचे कर्ज

जपान भारताला देणार १४, २५० कोटींचे कर्ज

भारतातील पाच प्रमुख पायाभूत प्रकल्पांसाठी जपान २४२.२ अब्ज येन किंवा १४,२५० कोटी रुपये कर्ज देणार आहे. यात मालगाड्यांसाठी स्वतंत्र मार्गाचा प्रकल्पाचा समावेश आहे.

By admin | Updated: April 1, 2016 03:50 IST2016-04-01T03:50:50+5:302016-04-01T03:50:50+5:30

भारतातील पाच प्रमुख पायाभूत प्रकल्पांसाठी जपान २४२.२ अब्ज येन किंवा १४,२५० कोटी रुपये कर्ज देणार आहे. यात मालगाड्यांसाठी स्वतंत्र मार्गाचा प्रकल्पाचा समावेश आहे.

Japan will give 14 lac 250 crores loan to India | जपान भारताला देणार १४, २५० कोटींचे कर्ज

जपान भारताला देणार १४, २५० कोटींचे कर्ज

नवी दिल्ली : भारतातील पाच प्रमुख पायाभूत प्रकल्पांसाठी जपान २४२.२ अब्ज येन किंवा १४,२५० कोटी रुपये कर्ज देणार आहे. यात मालगाड्यांसाठी स्वतंत्र मार्गाचा प्रकल्पाचा समावेश आहे.
हे कर्ज अधिकृत विकास साह्यता (ओडीए) च्या रूपात केले जाईल. त्यात मध्यप्रदेशातील पारेषण प्रणाली मजबूत करण्यासाठी १५.४५ अब्ज येन, ओडिशातील एकीकृत साफसफाई सुधार प्रणाली मजबूत करण्यासाठी २५.७ अब्ज येन आणि समर्पित मालवाहतूक प्रकल्प (टप्पा-एक ) आणि टप्पा तीनसाठी १०३.६ अब्ज येन किंवा ६,१७० कोटी अर्थसाह्य केले जाणार आहे.
याशिवाय ईशान्य भारतातील रस्त्यांचे जाळे सुधारण्यासाठी ६७.१ अब्ज येन, झारखंडमध्ये सूक्ष्म ड्रिप सिंचन प्रकल्पाद्वारे फळबागातील सुधारणांसाठी ४.६५ अब्ज येन दिले जाणार आहेत. हे सारे कर्ज जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेद्वारे (जिका) दिले जाणार आहे.
अधिकृत विकास साह्यता अंतर्गत दिले जाणारे कर्ज साधारणपणे द्विपक्षीय मदत आणि बहुपक्षीय मदतीच्या स्वरूपात दिले जाते. विशेषत: द्विपक्षीय मदतीतहत विकसनशील देशांना थेट मदत दिली जाते; तर बहुपक्षीय मदत आंतरराष्ट्रीय संघटनाद्वारे दिली जाते. जिकाद्वारे द्विपक्षीय मदत तांत्रिक सहकार्य जपानी ओडीप कर्ज आणि अनुदान साह्यता यांच्या रूपात केली जाते.
वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, याबाबत आर्थिक प्रकल्पांचे संयुक्त सचिव एस. सेल्वाकुमार आणि भारतातील जपानचे राजदूत केंजी हिरामात्सू यांच्यात कागदपत्रांची देवाणघेवाण करण्यात आली. गुरुवारी वित्तीय वर्ष समाप्त झाले. या वर्षात ३९० येन कर्ज देण्याची घोषणा जपानने केली होती.
भारत आणि जपान यांच्यात १९४८ पासून द्विपक्षीय फायद्यांचा विकास सहकार्याचा करार १९५८ पासून कार्यान्वित आहे.

Web Title: Japan will give 14 lac 250 crores loan to India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.