मुंबई : एक लाखात देखणी कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओळखल्या जाणाऱ्या नॅनोचे नवे मॉडेल टाटा कंपनीने आज येथे सादर केले. पॉवर स्टिअरिंग, आॅटोगियरपासून प्रभावी वातानुकूलित यंत्रणा, ते सामान ठेवण्यासाठी डिझाईनमध्ये केलेला चातुर्यपूर्ण बदल अशी काही नव्या नॅनो गाडीची वैशिष्ट्ये असून तरुणाईच्या गरजांचा वेध घेऊन त्यांची पूर्तता करेल अशी ही ‘जेन नेक्स्ट नॅनो’ कंपनीने दिमाखदार सोहळ््यात सादर केली.
नॅनो गाडीचे कल्पक निर्माते आणि कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष गिरीश वाघ यांनी सांगितले की, भारतीय रस्ते, ट्रॅफिकची स्थिती, लोकांची गाडीच्या अॅव्हरेजबद्दल असलेली आस्था, नव्या सुविधांचा अंतर्भाव, किंमत असे विविध मुद्दे लक्षात घेत या गाडीच्या डिझाईनिंगवर भर देण्यात आले.
या आणि अशा विविध मुद्यांवर गाडी ग्राहकांच्या पसंतीस उतरेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. कंपनीच्या प्रवासी वाहन विभागाचे अध्यक्ष मयांक पारीख यांनी सांगितले की, ही कार अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन फिचर्ससह सादर करण्यात आली आहे. कंपनीच्या ४५0 आऊटलेटस्वर ती देशभरात उपलब्ध करून देण्यात येत आहे. या कारची प्रारंभिक किंमत १.९९ लाख रुपये आहे. मॅन्युअल ट्रान्समिशन असलेल्या एक्सई आवृत्तीची किंमत २.४९ लाख रुपये आहे.
या नावाच्या कारची राजधानी दिल्लीतील किंमत २.८९ लाख रुपयांपर्यंत आहे. या आधी कंपनीने आॅटोमोटिव्ह मॅन्युअल ट्रान्समिशन असलेले दोन मॉडेल सादर केले आहेत. त्यातील एक्सएमए मॉडेलची किंमत २.६९ लाख रुपये आहे. नॅनोने टाटाला कार उत्पादनाच्या बाबतीत जागतिक नकाशावर आणले
आहे. (प्रतिनिधी)
टाटांनी सादर केली ‘जेन नेक्स्ट नॅनो’
एक लाखात देखणी कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओळखल्या जाणाऱ्या नॅनोचे नवे मॉडेल टाटा कंपनीने आज येथे सादर केले.
By admin | Updated: May 20, 2015 01:41 IST2015-05-20T01:41:15+5:302015-05-20T01:41:15+5:30
एक लाखात देखणी कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओळखल्या जाणाऱ्या नॅनोचे नवे मॉडेल टाटा कंपनीने आज येथे सादर केले.
