Lokmat Money > बिझनेस न्यूज > जेटली यांचा व्याजदर कपातीचा आग्रह

जेटली यांचा व्याजदर कपातीचा आग्रह

नव्या आर्थिक वर्षातील पहिल्या पतधोरण आढाव्याच्या पूर्वसंध्येला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी धोरणात्मक व्याजदरात कपात करण्यावर जोर दिला आहे.

By admin | Updated: April 5, 2016 00:27 IST2016-04-05T00:27:13+5:302016-04-05T00:27:13+5:30

नव्या आर्थिक वर्षातील पहिल्या पतधोरण आढाव्याच्या पूर्वसंध्येला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी धोरणात्मक व्याजदरात कपात करण्यावर जोर दिला आहे.

Jaitley urges interest rate cut | जेटली यांचा व्याजदर कपातीचा आग्रह

जेटली यांचा व्याजदर कपातीचा आग्रह

नवी दिल्ली : नव्या आर्थिक वर्षातील पहिल्या पतधोरण आढाव्याच्या पूर्वसंध्येला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी धोरणात्मक व्याजदरात कपात करण्यावर जोर दिला आहे. उच्च व्याजदर अर्थव्यवस्थेला कमजोर करतात, असे त्यांनी म्हटले.
सीआयआयच्या वार्षिक अधिवेशनात बोलताना जेटली म्हणाले की, सरकारने वित्तीय तूट ठेवण्याची आपली वचनबद्धता निभावली आहे. महागाईही नियंत्रात आहे. या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला अधिक स्पर्धात्मक ठेवण्यासाठी व्याजदर स्पर्धात्मक राहतील, अशी आम्हाला आशा वाटते.
मंगळवारी रिझर्व्ह बँकेकडून नव्या आर्थिक वर्षाचा पहिला पतधोरण आढावा जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर जेटली यांच्या वक्तव्याला महत्त्व आहे. जेटली यांनी म्हटले की, भारतासारख्या मोठ्या आणि वादविवादांनी भरलेल्या लोकशाही देशात व्याजदरासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवरील चर्चा योग्य दिशेनेच व्हायला हवी. उदा. काही राजकीय गट उच्च व्याजदराची वकिली करीत आहेत. तथापि, उच्च व्याजदर अर्थव्यवस्थेला कमजोर करू शकतात. आपल्या लोकशाही समोर अनेक आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत सरकार उद्योगांसाठी चर्चा योग्य दिशेने होणे अत्यंत आवश्यक आहे.

Web Title: Jaitley urges interest rate cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.