नवी दिल्ली : व्याजदरात कपात झाली पाहिजे यावर भर देताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी चलनवाढ नियंत्रणात आहे, वस्तूंच्या व तेलाच्या किमतीही खाली आल्या आहेत हे मुद्दे रिझर्व्ह बँक मौद्रिक धोरणाचा आढावा घेताना विचारात घेईल अशी आशा व्यक्त केली.
खासगी वृत्त वाहिनीशी बोलताना जेटली म्हणाले की, ‘व्यापकदृष्ट्या विचार केला तर चलनवाढ नियंत्रणात असून वस्तूंचे व तेलाचे भाव खाली आलेले आहेत. मान्सूनचा विचार केला तर आॅगस्ट आणि सप्टेंबरचा महिना फारसा उत्साहवर्धक दिसत नाही. किमान जुलैमध्ये तरी मान्सून खूप चांगला होता म्हणून कृषी उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप चांगले राहील असे दिसते. म्हणून मला वाटते की खाद्यवस्तूंच्या किमती खूप अधिक वाढतील, असे मला वाटत नाही.’
जेटली म्हणाले की, या स्थितीत व्याजदरात कपात करण्याचा विशेषाधिकार रिझर्व्ह बँकेला आहे. व्यावसायिक आर्थिक संस्था या नात्याने रिझर्व्ह बँक या कारणांकडे लक्ष देईल, असे वाटते. रिझर्व्ह बँकेसारख्या संस्थेवर आम्हाला थोडा विश्वास ठेवावा लागेल.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
रिझर्व्ह बँकेकडून जेटलींना व्याजदर कपातीची अपेक्षा
व्याजदरात कपात झाली पाहिजे यावर भर देताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी चलनवाढ नियंत्रणात आहे, वस्तूंच्या व तेलाच्या किमतीही खाली आल्या आहेत
By admin | Updated: August 31, 2015 22:22 IST2015-08-31T22:22:41+5:302015-08-31T22:22:41+5:30
व्याजदरात कपात झाली पाहिजे यावर भर देताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी चलनवाढ नियंत्रणात आहे, वस्तूंच्या व तेलाच्या किमतीही खाली आल्या आहेत
