Lokmat Money > बिझनेस न्यूज > फसवणुकीची माहिती सेबीला देणे बंधनकारक

फसवणुकीची माहिती सेबीला देणे बंधनकारक

सूचीबद्ध कंपन्यांच्या कार्यकारी मंडळातील कोणा सदस्याने कुठल्याही प्रकारची फसवणूक केली

By admin | Updated: March 25, 2015 23:56 IST2015-03-25T23:56:26+5:302015-03-25T23:56:26+5:30

सूचीबद्ध कंपन्यांच्या कार्यकारी मंडळातील कोणा सदस्याने कुठल्याही प्रकारची फसवणूक केली

It is mandatory to disclose the details of fraud to Sebi | फसवणुकीची माहिती सेबीला देणे बंधनकारक

फसवणुकीची माहिती सेबीला देणे बंधनकारक

नवी दिल्ली : सूचीबद्ध कंपन्यांच्या कार्यकारी मंडळातील कोणा सदस्याने कुठल्याही प्रकारची फसवणूक केली आणि त्यामुळे आर्थिक व्यवहारांवर परिणाम झाल्यास त्याचा पूर्ण तपशील कंपनीने आम्हाला सादर करावा लागेल, असे शेअर बाजार नियंत्रक व्यवस्था सेबीने म्हटले.
सेबीच्या या नव्या नियमांमुळे सूचीबद्ध कंपन्यांकडून बाजारचा कल पाहून ठराविक माहिती गुप्तरीत्या उपलब्ध करण्यावर प्रतिबंध येईल व त्यातून गुंतवणूकदारांचेही हित राखले जाईल. सेबीच्या संचालक मंडळाने या खुलासा नियमांतील बदलांना मान्यता दिली आहे. कंपनीची फसवणूक, प्रमुख व्यवस्थापकाला झालेली अटक किंवा त्याची झालेली चूक याची माहिती तात्काळ सेबीला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. कंपनीने शेअर बाजारलाही याची माहिती देणे बंधनकारक आहे. अशा घटनांचा अपेक्षित परिणाम, त्यात सहभागी असलेल्यांची नावे आदी तपशीलही शेअर बाजारला द्यावा लागेल.

Web Title: It is mandatory to disclose the details of fraud to Sebi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.