Lokmat Money > बिझनेस न्यूज > घटविलेले कर वसुलीचे लक्ष्यही गाठणे दूरच

घटविलेले कर वसुलीचे लक्ष्यही गाठणे दूरच

सरकारने २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी प्रत्यक्ष कर वसुलीचे सुधारित लक्ष्यही केवळ ६,३०,००० कोटी रुपयेच वसूल झाल्यामुळे गाठले जाण्याची शक्यता नाही. आयकर खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

By admin | Updated: April 1, 2015 01:45 IST2015-04-01T01:45:11+5:302015-04-01T01:45:11+5:30

सरकारने २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी प्रत्यक्ष कर वसुलीचे सुधारित लक्ष्यही केवळ ६,३०,००० कोटी रुपयेच वसूल झाल्यामुळे गाठले जाण्याची शक्यता नाही. आयकर खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

It is far-reaching to meet the target of reduced tax collection | घटविलेले कर वसुलीचे लक्ष्यही गाठणे दूरच

घटविलेले कर वसुलीचे लक्ष्यही गाठणे दूरच

मुंबई : सरकारने २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी प्रत्यक्ष कर वसुलीचे सुधारित लक्ष्यही केवळ ६,३०,००० कोटी रुपयेच वसूल झाल्यामुळे गाठले जाण्याची शक्यता नाही. आयकर खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
अतिशय मंद गतीने गोळा होणारा कर पाहून सरकारने २०१४-१५ वर्षासाठी निश्चित केलेले ७,३६,००० कोटी रुपयांचे लक्ष्य घटवून ७,०५,००० कोटी रुपये निश्चित केले.
कमी केलेले सुधारित लक्ष्यही गाठले जाण्याची शक्यता दिसत नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले. २४ मार्च रोजी आयकर विभागाने देशात ६,३०,००० कोटी रुपये गोळा केले. गेल्या वर्षी याच कालावधीत ५,८३,००० कोटी रुपये गोळा झाले होते. ही वसुली ८.२ टक्क्यांनी वाढलेली आहे. आयकर वसुलीत मुंबई देशातील मोठे केंद्र राहिले आहे. तेथे १,९९,४२६ कोटी रुपये जमले. गेल्या वर्षी याच कालावधीत मुंबईने १,७९,७६३ कोटी रुपये दिले होते. ही वाढ १०.९ टक्क्यांची आहे. आयकर विभागाने २०१४-२०१५ या आर्थिक वर्षासाठी मुंबईतून २.३० ट्रिलियन गोळा करण्याचे लक्ष्य ठरविले होते.




 

Web Title: It is far-reaching to meet the target of reduced tax collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.