Lokmat Money > बिझनेस न्यूज > आयटी कंपन्यांनी शेअर बाजाराला सावरले

आयटी कंपन्यांनी शेअर बाजाराला सावरले

आयटी कंपन्यांच्या शेअर्सनी उत्तम तेजी प्राप्त केल्यामुळे शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले.

By admin | Updated: July 19, 2014 00:10 IST2014-07-18T23:28:29+5:302014-07-19T00:10:44+5:30

आयटी कंपन्यांच्या शेअर्सनी उत्तम तेजी प्राप्त केल्यामुळे शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले.

IT companies retained the stock market | आयटी कंपन्यांनी शेअर बाजाराला सावरले

आयटी कंपन्यांनी शेअर बाजाराला सावरले


मुंबई : आयटी कंपन्यांच्या शेअर्सनी उत्तम तेजी प्राप्त केल्यामुळे शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. ८0 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स २५,६४१.५६ अंकांवर बंद झाला. त्याबरोबर बाजार दोन आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.
युक्रेनमध्ये मलेशियाचे एक प्रवासी विमान पाडण्यात आल्याच्या घटनेमुळे जगभरातील बाजारात अस्थिर वातावरण होते. आशियाई बाजारांत मंदीची चाल दिसून आली. त्याचा परिणाम भारतीय बाजारांवरही झाला. सकाळी बाजार मंदीनेच उघडला. मात्र, नंतर बाजार मंदीतून सावरत हळूहळू तेजीकडे परतला. बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये झालेल्या खरेदीचीही बाजाराला सावरण्यासाठी मदत झाली.
आयटी क्षेत्रातील जायंट कंपनी टीसीएसने काल सायंकाळी आपले तिमाही निकाल घोषित केले. त्यात कंपनीने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केल्याचे दिसून आले. त्याचा चांगला परिणाम आयटी कंपन्यांच्या शेअर्सवर झाला. या क्षेत्रात गुंतवणूकदारांनी मोठी खरेदी केली. टीसीएसचा शेअर २.५८ टक्के वाढीसह लाभधारक कंपन्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानी राहिला. विप्रोने १.८३ टक्क्यांची वाढ नोंदविली, तर इन्फोसिसने 0.३१ टक्क्यांची वाढ नोंदविली.
बीएसई स्मॉलकॅप आणि बीएसई मीडकॅपमध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात नफावसुली केली. त्यामुळे हे दोन्ही निर्देशांक लाल झोनमध्ये गेले. सेन्सेक्सवर त्याचा मोठा परिणाम दिसून आला, असे व्यावसायिकांनी सांगितले.
३0 कंपन्यांचा समावेश असलेल्या बीएसई सेन्सेक्सची सकाळची सुरुवात स्थिरतेने झाली होती; मात्र लगेचच तो उतरणीला लागला. आशियाई बाजारातील मंदीच्या सावटाखाली असलेला सेन्सेक्स २५,४४१.२४ अंकांपर्यंत खाली घसरला होता. नंतर हळहळू त्यात सुधारणा होत गेली. तो २५,७१३.४0 अंकांपर्यंत वर चढला. सत्राअखेरीस ८0.४0 अंकांची वाढ नोंदवीत सेन्सेक्स २५,६४१.५६ अंकांवर बंद झाला. ७ जुलै रोजी सेन्सेक्स २६,१00.0८ अंकांवर बंद झाला होता. त्यानंतरचा हा सर्वोच्च बंद ठरला आहे.
गेल्या ४ दिवसांत सेन्सेक्सने ६३४ अंकांची कमाई केली आहे. संपूर्ण आठवड्यात तो ६१७.२१ अंकांनी वर चढला आहे.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या निफ्टीमध्ये २३.४५ अंकांची वाढ मिळविली आहे. ५0 कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश असलेला निफ्टी 0.३१ टक्क्यांच्या वाढीसह ७,६६३.९0 अंकांवर बंद झाला. निफ्टीचा हा दोन आठवड्यांचा उच्चांक ठरला आहे.
विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी काल १,९१२.४२ कोटी रुपयांची खरेदी केली असल्याचे बीएसईमार्फत सांगण्यात आले.
आशियाई बाजारांपैकी हाँगकाँग, दक्षिण कोरिया आणि तैवान येथील बाजार 0.0७ टक्के ते १.0१ टक्के कोसळले. चीन आणि सिंगापूर येथील बाजार मात्र 0.११ ते 0.१७ टक्क्यांनी वर चढले. युरोपीय शेअर बाजारातही मंदीची चाल दिसून आली. फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटनमधील बाजार 0.३0 ते 0.७२ टक्क्यांनी खाली चालत होते. बीएसईच्या क्षेत्रवार निर्देशांकापैकी आयटी निर्देशांक १.४३ टक्क्यांनी, टेक निर्देशांक 0.९१ टक्क्यांनी, तर बँकेक्स 0.७७ टक्क्यांनी वर चढला. या उलट ऊर्जा निर्देशांक १.३४ टक्क्यांनी, रिअल्टी 0.८८ टक्क्यांनी तर आॅईल अँड गॅस 0.७७ टक्क्यांनी घसरला.
कालच्या तुलनेत बाजाराची एकूण उलाढालही आज घसरली. आज ३,0१५.७९ कोटींची उलाढाल झाली. काल ४,५१९.३0 कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. (प्रतिनिधी)

Web Title: IT companies retained the stock market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.