भगवत यांच्या भाषणाच्याथेट प्रसारणाने पेटला वादघातक परंपरा: विरोधकांची टीका, सरकारकडून समर्थननवी दिल्ली- सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नागपूर येथील भाषणाचे दूरदर्शनवर थेट प्रसारण झाल्यामुळे वाद उफाळला असून, विरोधी पक्ष सरकारवर कडाडून टीका करत आहेत. सरकारी वाहिनीचा सत्ताधारी पक्षाकडून गैरवापर केला जात असल्याची टीका विरोधकाकडून केली जात आहे, तर भाजपा आपल्या कृतीचे समर्थन करत आहे. भागवत यांच्या तासाभराच्या भाषणाचे भाषणाचे प्रसारण ही घातक परंपरा असल्याचे काँग्रेस प्रवक्ता संदीप दीक्षित यांनी म्हटले आहे. आरएसएस ही वादग्रस्त संघटना असून , तिच्या प्रमुखाचे भाषण प्रसारीत करण्याचा सरकारचा हा निर्णय राजकीय असल्याचा दावा दीक्षित यांनी केला. यापुढे देशाचे नियंत्रण नागपूरहून होईल अशी भीती काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी व्यक्त केली. फॉर नागपूर, बाय नागपूर आणि ऑफ नागपूर असा अधिकृत मेडिया असेल व या घटनेने भाजपाचा खरा रीमोट कंट्रोल कोण आहे हे समोर आले आहे, असे सिंघवी म्हणाले. सरकारी यंत्रणेचा गैरवापर करण्याच्या या कृतीचा विरोध केला पाहिजे असे रशीद अल्वी म्हणाले तर आरएसएसच्या राष्ट्रीयत्वाचे रेकॉर्ड आमच्या राष्ट्रीय भावनेपेक्षा वरचढ असल्याचे आम्ही मान्य करणार नाही. असे माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद म्हणाले. आरएसएसने या प्रसंगाचा वापर आपले हिंदुत्वाचे तत्वज्ञान प्रसिद्ध करण्यासाठी केला, दूरदर्शनने आरएसएससारख्या संघटनेच्या प्रमुखाचे भाषण थेट प्रसारीत करण्याचा उद्योग करायला नको होता. असे भाकपचे सरचिटणीस डी. राजा म्हणाले. ही परंपरा अस्वस्थ व बेचैन करणारी आहे, यामुळे देशाच्या धर्मनिरपेक्ष व लोकशाही प्रतिमेला धक्का बसला आहे, असे त्यानी सांगितले. हा सरकारी यंत्रणेचा गैरवापर असल्याचे जद (सं) प्रवक्ता के.सी. त्यागी म्हणाले, भविष्यात माहिती व प्रसारण मंत्रालयाने अशा घटनांचे प्रसारण न करण्याचे भान बाळगावे असे त्यानी म्हटले आहे. इतिहासतज्ञ रामचंद्र गुहा यांनी अशाच भावना व्यक्त केल्या आहेत. आरएसएस ही हिंदू संघटना आहे, आता मशिदीचे इमाम व चर्चचे बिशपही त्यांची भाषणे थेट प्रसारीत करण्याची मागणी करतील , असे गुहा यांनी आपल्या टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे. भागवत काय बोलतात हे लोकांना ऐकायचे असते , असे भाजपा प्रवक्त्या मीनाक्षी लेखी यांनी म्हटले आहे, प्रसार भारती ही स्वतंत्र संघटना आहे, कोणती बातमी प्रसारीत करायची याचा निर्णय घेण्याचा तिला अधिकार आहे असेही त्या म्हणाल्या. काँग्रेस व डावे पक्ष नसलेल्या मुद्यावर रान उठवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप लेखी यांनी केला. (लोकमत न्यूज नेटवर्क) (भागवत यांचे भाषण-आतील पानावर)---------------------कोट-आमच्यासाठी ती इतर कोणत्याही बातमीप्रमाणे एक बातमी होती, आम्ही ती प्रसारित केली. त्यासाठी कोणतीही विशेष तयारी करण्यात आली नव्हती. महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारासाठी वापरल्या जाणार्या डिजिटल सॅटेलाईट गॅदरिंग व्हॅन- डीएसएनजीचा एक घटक या प्रसारणासाठी वापरण्यात आला. आमच्या अनेक डीएसएनजी व्हॅन महाराष्ट्रात आहेत, त्यातील एक नागपूर येथील कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी वापरण्यात आली.-अर्चना दत्त, वृत्तसंचालक, दूरदर्शन------------------------------खरे तर इतकी वर्षे सरसंघचालकांच्या भाषणाचे थेट प्रसारण दूरदर्शनने का केले नाही, असा प्रश्न विचारायला हवा. दूरदर्शनला काँग्रेस सरकारने जोखडात ठेवले होते म्हणूनच असे झाले होते. आता तसे बंधन नाही. त्यामुळे एक बातमीची घटना म्हणून दूरदर्शनने त्याचे प्रसारण केले.-प्रकाश जावडेकर, राज्यमंत्री, माहिती व प्रसारण------------------------------- सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपुरातील भाषण दूरदर्शनने लाईव्ह टेलिकास्ट केले़ कारण आता त्यांची हुकूमत आहे़ आता त्यांचेच ऐकावे लागणार.-शरद पवार अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
पान १/ भागवत भाषण प्रसारणावरून वाद -------------------------
भागवत यांच्या भाषणाच्या
By admin | Updated: October 3, 2014 22:56 IST2014-10-03T22:56:21+5:302014-10-03T22:56:21+5:30
भागवत यांच्या भाषणाच्या
