नवी दिल्ली : लोह खनिजाची किंमत दहा वर्षांतील नीचांकी पातळीवर आल्याने खाण कंपन्यांची समस्या वाढली आहे. यावर उपाययोजना केली नाही तर एका वर्षात किमतीत आणखी घट होईल, असे कंपन्यांचे मत आहे.
गोव्यातून मोठ्या प्रमाणात लोह खनिज मिळते. ज्याची मात्रा ५५ ते ५८ टक्के आहे. याची निर्यात चीन आणि जपानसारख्या देशात होते. उद्योग संघटना गोवा मिनरल आणि एक्स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष शिवानंद व्ही. सालगावकर यांनी सांगितले की, ५७ टक्के लोह खनिजाची किंमत २९ डॉलर प्रति टन आहे. ही एका दशकातील सर्वात कमी किंमत आहे. ही परिस्थिती आव्हानात्मक आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर लोह खनिजाची मागणी घटल्याने किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे खाण कंपन्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गोव्यातील प्रमुख कंपनी व्ही.एस. सालगावकर समूहाचे मुख्य संचालक सालगावकर यांनी सांगितले की, या किमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबत भाष्य करताना जीएमओईएचे मानद सचिव अंबर टिंबलो यांनी सांगितले की, जागतिक स्तरावर चांगल्या दर्जाचे लोह खनिज प्रतिस्पर्धी किमतीत मिळत आहे. त्यामुळे ते खरेदीदार गोव्यातच का खरेदी करतील? या स्पर्धेत आम्हाला दक्ष राहावे लागेल, अन्यथा निर्यात होणार नाही, असेही ते म्हणाले.
लोह खनिजाची किंमत दहा वर्षांतील नीचांकावर
लोह खनिजाची किंमत दहा वर्षांतील नीचांकी पातळीवर आल्याने खाण कंपन्यांची समस्या वाढली आहे. यावर उपाययोजना केली नाही तर एका वर्षात किमतीत आणखी घट होईल, असे कंपन्यांचे मत आहे.
By admin | Updated: December 10, 2015 23:31 IST2015-12-10T23:31:41+5:302015-12-10T23:31:41+5:30
लोह खनिजाची किंमत दहा वर्षांतील नीचांकी पातळीवर आल्याने खाण कंपन्यांची समस्या वाढली आहे. यावर उपाययोजना केली नाही तर एका वर्षात किमतीत आणखी घट होईल, असे कंपन्यांचे मत आहे.
