Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > आयफोन 6s आणि 6sप्लस आता 22 हजारांनी स्वस्त

आयफोन 6s आणि 6sप्लस आता 22 हजारांनी स्वस्त

अॅपलने आपले जुने फोन iPhone 6s आणि iPhone 6s Plus या फोनच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. या दोन्ही फोनच्या किंमतीत तब्बल 22 हजारांची कपात कंपनीने केली आहे.

By admin | Updated: September 15, 2016 17:11 IST2016-09-15T16:17:07+5:302016-09-15T17:11:21+5:30

अॅपलने आपले जुने फोन iPhone 6s आणि iPhone 6s Plus या फोनच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. या दोन्ही फोनच्या किंमतीत तब्बल 22 हजारांची कपात कंपनीने केली आहे.

IPhone 6s and 6s plus now 22 thousand cheaper | आयफोन 6s आणि 6sप्लस आता 22 हजारांनी स्वस्त

आयफोन 6s आणि 6sप्लस आता 22 हजारांनी स्वस्त

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली,दि.15- अॅपलने आपला बहुचर्चित iPhone 7 आणि iPhone 7 Plus हे फोन नुकतेच लाँच केले.  त्या पार्श्वभूमीवर अॅपलने आपले जुने फोन  iPhone 6s आणि iPhone 6s Plus या फोनच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. या दोन्ही फोनच्या किंमतीत तब्बल 22 हजारांची कपात कंपनीने केली आहे.
 
त्यामुळे 82 हजार रुपयांचा  iPhone 6s (128GB) हा फोन आता केवळ  60 हजार रुपयांत तर   92 हजार रुपयांचा iPhone 6s Plus (128GB) हा फोन केवळ 70 हजार रुपयांत मिळणार आहे.  मात्र, 16 जीबी आणि 32 जीबीच्या फोनच्या किमतींविषयी माहिती देण्यात आलेली नाही. 
 
iPhone 7 आणि iPhone 7 Plus हे फोन भारतात  7 ऑक्टोबरपासून उपलब्ध होणार आहेत. त्यापुर्वीच कंपनीने जुन्या फोनच्या किंमतीत भरघोस कपात केली आहे. 

Web Title: IPhone 6s and 6s plus now 22 thousand cheaper