Lokmat Money > बिझनेस न्यूज > इराणचे भारताला गुंतवणुकीचे आवाहन

इराणचे भारताला गुंतवणुकीचे आवाहन

आमच्यावरील आर्थिक निर्बंध उठल्यानंतरच्या परिस्थितीचा लाभ घेण्यासाठी भारताने पायाभूत सुविधांमध्ये ८ अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक

By admin | Updated: July 26, 2015 22:59 IST2015-07-26T22:51:57+5:302015-07-26T22:59:40+5:30

आमच्यावरील आर्थिक निर्बंध उठल्यानंतरच्या परिस्थितीचा लाभ घेण्यासाठी भारताने पायाभूत सुविधांमध्ये ८ अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक

Invitation to Iran to Investigate India | इराणचे भारताला गुंतवणुकीचे आवाहन

इराणचे भारताला गुंतवणुकीचे आवाहन

नवी दिल्ली : आमच्यावरील आर्थिक निर्बंध उठल्यानंतरच्या परिस्थितीचा लाभ घेण्यासाठी भारताने पायाभूत सुविधांमध्ये ८ अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक इराणमध्ये करावी, असे आवाहन इराणने केले आहे. इराणचे भारतातील राजदूत गुलामरेझा अन्सारी यांनी येथे सांगितले की, भारताने आता स्वस्तातल्या वाटाघाटींमध्ये वेळ वाया न घालवता पाश्चिमात्य राष्ट्रांनी गुंतवणूक सुरू करायच्या आधी त्या संधीचा लाभ घ्यावा. इराणने अणुकरार केल्यानंतर पाश्चिमात्य राष्ट्रांनी त्याच्यावरील निर्बंध हटविले आहेत. येत्या ३ ते ५ महिन्यांत ते संपून जातील. इराण हा भारताचा विश्वासू भागीदार असल्याचे अन्सारी यांनी ठासून सांगितले. निर्बंधांच्या कठीण दिवसांतही इराणसोबत भारत होता. आता त्या नात्याचा भारताने लाभ उठवायला हवा, असे ते म्हणाले.

Web Title: Invitation to Iran to Investigate India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.