बीजिंग : भारताच्या वाढत्या पायाभूत क्षेत्रात चिनी कंपन्यांनी गुंतवणूक करावी, असे आवाहन भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले.
येथे ‘इन्व्हेस्टमेंट इन इंडिया’ या व्यावसायिक कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, संपूर्ण जगभरात प्रतिकूल वातावरण असूनही भारत ७.५ टक्के ते ८ टक्के दराने वृद्धी करणार आहे. भारत असा एकमेव देश राहणार आहे. सध्या आमचा वृद्धीचा जो दर आहे, त्यापेक्षा जास्त वृद्धी दर आम्ही गाठू, असा आम्हाला विश्वास वाटतो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जागतिक वृद्धी घसरेल, असा अंदाज वर्तविला. त्याचे उदाहरण देऊन जेटली म्हणाले की, अपेक्षेप्रमाणे यंदा मान्सून चांगला राहिला, तर वृद्धीदर वाढविण्याची क्षमता आहे. प्रतिकूल परिस्थितीतही वृद्धीदर ७.५ टक्क्यांच्या वर ठेवणारा भारत एकमेव देश असेल, जर जागतिक वातावरण अनुकूल बनले, तर वृद्धीदर कुठपर्यंत जाईल हे मी स्वत: सांगू शकत नाही. (वृत्तसंस्था)
पायाभूत क्षेत्रात गुंतवणुकीचे चिनी कंपन्यांना निमंत्रण
भारताच्या वाढत्या पायाभूत क्षेत्रात चिनी कंपन्यांनी गुंतवणूक करावी, असे आवाहन भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले.
By admin | Updated: June 25, 2016 02:53 IST2016-06-25T02:53:08+5:302016-06-25T02:53:08+5:30
भारताच्या वाढत्या पायाभूत क्षेत्रात चिनी कंपन्यांनी गुंतवणूक करावी, असे आवाहन भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले.
