Lokmat Money > बिझनेस न्यूज > ६ आॅगस्टपासून ईपीएफओची शेअर बाजारात गुंतवणूक

६ आॅगस्टपासून ईपीएफओची शेअर बाजारात गुंतवणूक

कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) शेअर बाजारात ६ आॅगस्टपासून गुंतवणूक करू लागेल. चालू आर्थिक वर्षामध्ये ईपीएफओ ५ हजार कोटी रुपयांचे प्रारंभिक भांडवल

By admin | Updated: August 1, 2015 01:55 IST2015-08-01T01:55:16+5:302015-08-01T01:55:16+5:30

कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) शेअर बाजारात ६ आॅगस्टपासून गुंतवणूक करू लागेल. चालू आर्थिक वर्षामध्ये ईपीएफओ ५ हजार कोटी रुपयांचे प्रारंभिक भांडवल

Investments in the stock market of EPFO ​​since August 6 | ६ आॅगस्टपासून ईपीएफओची शेअर बाजारात गुंतवणूक

६ आॅगस्टपासून ईपीएफओची शेअर बाजारात गुंतवणूक

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) शेअर बाजारात ६ आॅगस्टपासून गुंतवणूक करू लागेल. चालू आर्थिक वर्षामध्ये ईपीएफओ ५ हजार कोटी रुपयांचे प्रारंभिक भांडवल ईटीएफमध्ये गुंतवणार आहे.
ईपीएफओचे केंद्रीय भविष्य निधी आयुक्त के. के. जालान यांनी येथे शुक्रवारी असोचेमच्या कार्यक्रमात ही माहिती दिली. आम्ही मुंबईत ६ आॅगस्ट रोजी शेअर बाजारात आमची पहिली गुंतवणूक करणार आहोत. कामगारमंत्री बंडारू दत्तात्रय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. कामगार मंत्रालयाने ईपीएफओसाठी नव्या गुंतवणुकीच्या योजनेची अधिसूचना गेल्या एप्रिलमध्ये प्रसिद्ध केली होती. त्यानुसार शेअर आणि शेअर्सशी संबंधित योजनांमध्ये आपल्या निधीतील किमान ५ व कमाल १५ टक्के रक्कम गुंतविण्यास मान्यता देण्यात आली आहे. तथापि, ईपीएफओने चालू आर्थिक वर्षात केवळ ५ टक्के रक्कमच ईटीएफमध्ये गुंतविण्याचा निर्णय घेतला आहे.
नेमकी किती गुंतवणूक केली जाईल असे विचारता जालान म्हणाले की, ते तर मलाही माहिती नाही. त्याचा निर्णय हा बाजारावर अवलंबून असेल. अर्थमंत्रालयाच्या अटींनुसार दरमहा वाढणाऱ्या रकमेपैकी १५ टक्क्यांपर्यंतची गुंतवणूक आम्ही करू शकतो; परंतु केंद्रीय न्यास मंडळाने आम्हाला प्रारंभी ५ टक्के गुंतवणुकीला परवानगी दिली आहे. एप्रिल ते जून या कालावधीत ईपीएफओची मासिक वाढ ही जवळपास ८,२०० कोटी रुपये असेल व त्यानुसार दरमहा ईपीएफओकडे गुंतविण्यासाठी ४१० कोटी रुपये असतील.
जालान म्हणाले की,‘‘आम्ही दीर्घकाळचे गुंतवणूकदार आहोत व दीर्घकाळच्या स्तरावर इक्विटी बाजाराचा कल सकारात्मक असू शकतो. इक्विटी दीर्घकाळच्या स्तरावर नेहमी चांगला नफा देते.’’ तरीही इक्विटीमध्ये जोखीम असतेच; परंतु ही जोखीम तशी कमी आहे, कारण आम्ही आमच्याकडे येणाऱ्या रकमेपैकी फक्त ५ टक्के गुंतविणार आहोत. आम्ही जर वर्षात ६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली तरी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आमच्याकडील ६.५ लाख कोटी रुपयांच्या एक टक्क्यापेक्षाही कमीच ही रक्कम असेल, असे के. के. जालान म्हणाले. ईटीएफमध्ये गुंतवणूक आणि शेअर बाजारची स्थिती माहिती करून घेण्यासाठी ईपीएफओने स्टेट बँक आॅफ इंडिया म्युच्युअल फंडाशी करार केला आहे. ईपीएफओने आतापर्यंत शेअर बाजारात गुंतवणूक केलेली नाही.

सदस्यांना विचारणार
ईपीएफओचे आयुक्त के.के. जालान यांनी सांगितले की, येत्या एक-दोन वर्षात भविष्य निर्वाह निधीच्या सदस्यांना विचारुनच कोठे गुंतवणूक करावयाची याचा निर्णय घेतला जाईल.
सतत चढ-उतार असणाऱ्या शेअर बाजारात ईपीएफओने गुंतवणूक करू नये अशी भूमिका ईपीएफओच्या धोरण ठरविणाऱ्या संस्थेतील कामगार संघटनांच्या काही प्रतिनिधींनी सातत्याने घेतली आहे.

Web Title: Investments in the stock market of EPFO ​​since August 6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.